लायन्स क्लब संगमनेर सफायरच्या वतीने मोफत कॅन्सर रोग निदान शिबीराचे आयोजन
प्रतिनिधी —
लायन्स क्लब संगमनेर सफायर आयोजित, टाटा मेमोरियल हॉस्पिटल संलग्नित इंडियन कॅन्सर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने, उमंग फाऊंडेशन यांच्या सहकार्याने व स्व. माधवलालजी मालपाणी यांच्या स्मरणार्थ मोफत कॅन्सर रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते सायं. ४ वाजेपर्यंत मालपाणी लॉन्स, संगमनेर येथे तर रविवार दि. ९ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ९ ते सायं.४ वाजेपर्यंत सिध्दकला हॉस्पिटल, संगमनेर खुर्द येथे या शिबीराचे आयोजन केलेले आहे.

शिबीरामध्ये शारीरिक तपासणी, सल्ल्यानुसार मॅमोग्राफी, सर्जिकल एक्झामिनेशन करण्यात येणार आहे. एका दिवशी फक्त ५० महिला आणि ५० पुरूषांचीच तपासणी करण्यात येणार असून प्रथम नोंदणी करणार्या व्यक्तीस प्राधान्य देण्यात येणार आहे.

तपासणीसाठी येणार्या वक्तीने आपले आधार कार्ड सोबत ठेवावे आणि वेळेवर हजर रहावे असे आवाहन प्रकल्प प्रमुख संदीप चोथवे, श्रीनिवास भंडारी, डॉ. नैमिष सराफ, डॉ. मधुरा पाठक, डॉ. ऋता सराफ, पूजा कासट तसेच प्रकल्प समितीने केले आहे.

शिबीरामध्ये नाव नोंदणीसाठी श्री सिध्दीविनायक प्लायवुड (02425 220803), बी.एड. कॉलेज समोर, संगमनेर, श्री साई मार्बल्स (9422792073), सह्याद्री कॉलेज समोर, संगमनेर व विजय सोनवणे (9850356821), उमंग फाउंडेशन, संगमनेर या ठिकाणी संपर्क करण्याचे आवाहन संस्थापक तसेच माजी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर गिरीष मालपाणी, अध्यक्ष उमेश कासट, सचिव कल्याण कासट, खजिनदार गौरव राठी यांनी केले आहे.

कॅन्सरग्रस्तांची संख्या वाढतेय – गिरीश मालपाणी
नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मेटीक्स अँड रिसर्च या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेच्या अहवालानुसार २०२५ पर्यंत जवळपास ६२ हजार पुरूषांना तर 68 हजार महिलांना कॅन्सरचे निदान होणार आहे. ज्यामध्ये अगदी लहानग्यांपासून तर जेष्ठ व्यक्तीपर्यंत सर्वांनाचा याला सामोरे जावे लागणार आहे. कॅन्सरचे निदान लवकर झाले तर तो बरा होऊ शकतो. त्यामुळे लायन्स क्लब संगमनेर सफायच्या वतीने सामाजिक काम म्हणून या मोफत शिबीराचे आयोजन केले असून लवकर निदान होण्यासाठी गरजूंनी याचा अवश्य लाभ घ्यावा.

