तहसील कार्यालयाच्या आवारातून वाळूने भरलेली रिक्षा वाळू तस्कराने चोरून नेली !

प्रतिनिधी —

संगमनेर शहर व तालुक्यातील वाळू तस्करीचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो. आता वाळू तस्करांची मुजोरी एव्हढी वाढली आहे की वाळू तस्करी करत असताना पकडलेली रिक्षा तहसीलदार यांच्या कार्यालयाचा आवारात लावलेली असताना देखील ती चोरून नेण्याचा प्रताप वाळूतस्कराने केल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात संबंधित वाळू तस्करावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे याच आवारात शहर पोलीस स्टेशन देखील आहे.

नवे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर जिल्ह्यातील आणि विशेषत: संगमनेर तालुक्यातील वाळू तस्करी मोडून काढण्याचे ठरविले आहे. वाळू तस्करांवर कडक कारवाई आदेश देखील त्यांनी दिले आहेत. तरीही संगमनेर शहरातली वाळू तस्करी थांबण्याचे नाव घेत नसल्याचे या घटनेतून उघड झाले आहे. रिक्षा, गाढवे, मारुती व्हॅन वाळू तस्करीसाठी वापरले जात आहेत.

फारूक युसुफ शेख राहणार संगमनेर खुर्द असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात मंडळ अधिकारी बापूसाहेब भानुदास ससे यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, दिनांक २९/ ९/२०२२ रोजी दुपारी संगमनेर शहरालगत प्रवरा नदी पात्रातून एका रिक्षातून आरोपी शेख हा वाळूची बेकायदेशीर चोरी आणि वाहतूक करीत असल्याची माहिती नायब तहसीलदारांकडून मिळाली. त्यानंतर मी व तलाठी योगिता भोजराम शिंदे आणि धनराज नूरसिंग राठोड असे आम्ही नदीपात्रात गेलो असता त्या ठिकाणी दुपारी नदीपात्रामध्ये रिक्षा मधून वाळू घेऊन जात असताना दिसले.

तहसील कार्यालयाच्या आवारातून वाळू तस्करांनी पकडलेल्या वाळूच्या गाड्या चोरून नेण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वी देखील तहसील कार्यालयातून पकडलेले वाळूचे ट्रॅक्टर, गाड्या, रिक्षा वाळू तस्करांनी चोरून नेल्या आहेत. तहसील कार्यालयातून गाडी चोरून नेण्याची हिंमत मात्र वाळू तस्करांची वाढली आहे. यास कारणीभूत कोण असा सवाल उपस्थित झाला आहे.

 

त्यावेळी आम्ही सदर रिक्षा थांबून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने फारूक शेख (राहणार संगमनेर खुर्द) असे सांगितले. आम्ही त्यास नंबर नसलेल्या रिक्षासह कारवाई करिता तहसील कार्यालयाच्या रिक्षा आणून लावली व त्यास कारवाई करतात तहसीलदार साहेबांकडे पाठविले. परंतु सदर इसम तहसीलदार यांच्याकडे न जाता व कुठल्याही प्रकारचा दंडन भरता परस्पर तहसील कार्यातून गायब झाला.

सदर रिक्षा तहसील कार्यालयाच्या आवारातच उभी होती. परंतु त्यानंतर रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास तहसील कार्यालयात लावलेली रिक्षा आम्हास दिसली नाही. त्यामुळे मी तहसीलदार यांच्याकडे या संदर्भात चौकशी केला असता त्यांनी सांगितले की संबंधित व्यक्ती आले नाही व दंड ही भरला नाही. आम्ही रिक्षाचा शोध घेत असता रिक्षा सुद्धा मिळून आली नाही. त्यामुळे आमचे खात्री पटली की रिक्षा तहसील कार्यालयाच्या आवारातून वाळू सह चोरून नेली आहे त्यामुळे त्याच्याविरुद्ध फिर्याद देत आहोत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!