भारतातील जैवविविधता वन्यजीव पर्यटन क्षेत्रासाठी पोषक — गणेश रणदिवे

संगमनेर महाविद्यालयात जागतिक पर्यटन दिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी —

वन्यजीव पर्यटनाला प्रोत्साहित केल्यास देशातील जंगले तसेच वन्यजीवांचे संवर्धन करण्यास मदत होईल. तसेच वन्यजीव पर्यटनामुळे जनमानसात वन्यजीव व त्यांचे महत्व या संदर्भात मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण करता येते. असे प्रतिपादन नाशिक विभागातील सहाय्यक वन संरक्षक (वन्यजीव) गणेश रणदिवे यांनी केले.

संगमनेर महाविद्यालयातील बी.व्होक. आदरातिथ्य व पर्यटन (हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम) विभागाच्या वतीने जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणुन ते बोलत होते. यावेळी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपणी, प्राचार्य प्रा. डॉ. अरुण गायकवाड, विभागप्रमुख डॉ.रविंद्र गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

महाविद्यालयातील बी.व्होक आदरातिथ्य व पर्यटन विभागात दरवर्षी प्रमाणे यावर्षीही जागतिक पर्यटन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संस्थेच्या २०२२ मधील rethinking tourism या संकल्पनेवर आधारित निबंध स्पर्धा, पथनाट्य, शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य व तसेच विद्यार्थ्यानी बनवलेलें अमेरिकन, मेक्सिकन, ग्रीक, टर्किश ई. देशांचे खाद्यपदार्थ यांचे प्रदर्शन असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

प्रास्ताविक करताना विभागप्रमुख डॉ.रविंद्र गायकवाड म्हणाले की, महाविद्यालयातील बी.व्होक आदरातिथ्य व पर्यटन (एच.टी) विभागद्वारे सामाजिक, सांस्कृतिक, राजकिय व आर्थिक मुल्ये वृध्दींगत करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. जगातील पर्यटन व्यवसाय हा युवकांना आज जास्तीत जास्त नोकरी व व्यवसायीक संधी देणारा घटक असून युवकांनी तंत्रज्ञानाचा वापर करुन या व्यवसायात आपले स्थान निर्माण करावे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.चिन्मय तिवारी यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.रविंद्र गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम विभागतील प्रा.राहुल गायकवाड, प्रा.वाकचौरे पी.आर, प्रा.कडलग एम. तसेच शिक्षकेतर सहकारी रवींद्र भोकणल, सचिन चौधरी व विभागातील सर्व विद्यार्थी आदींचे सहकार्य लाभले.

 

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!