लायन्स सफायरकडून ३०० जंगली झाडांचे वृक्षारोपण…

बिरेवाडी येथे ट्री गार्ड आणि ठिबकसह रोपांची लागवड 

प्रतिनिधी — 

लायन्स क्लब संगमनेर सफायर यांच्या वतीने नुकतेच नान्नज धुमाला येथील बिरेवाडी गावामध्ये ३०० जंगली झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. दरवर्षी लायन्स क्लब संगमनेर सफायरकडून या प्रकल्पाचे आयोजन केले जाते. यावर्षी हाती घेतलेला प्रकल्प अनोखा होता. वृक्षारोपण झाल्यानंतर या झाडांचे संपूर्ण संगोपन कसे करता येईल याचा विचार करण्यात आला.

प्रकल्प प्रमुख देविदास गोरे, श्रीनिवास भंडारी यांच्या संकल्पनेतून आणि सफायरचे आधारस्तंभ गिरीश मालपाणी, अध्यक्ष उमेश कासट, सचिव कल्याण कासट, खजिनदार गौरव राठी यांच्या प्रयत्नातून रोपांचे संरक्षण आणि ठिबक सिंचन याचे काम करण्यात आले. ३०० जंगली झाडांना ट्री गार्ड आणि दोन हजार फूट लांबीचे ठिबक सिंचन करण्यात आले.

बांबू, कडूलिंब, अशोका, सरू, बेल, चिंच, हिरडा, अर्जुन सादडा, आवळा, बकुल, कांचन बहावा अशा विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपण प्रकल्पासाठी संत ज्ञानेश्वर विद्यालय, नान्नज दुमाला येथील शिक्षक वृंद, विद्यार्थी तसेच बिरेवाडी ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.

बिरोबा मंदिर ते स्मशानभूमी रस्त्याच्या दूतर्फा या रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी संपूर्ण बिरेवाडी ग्रामस्थांनी या रोपांचे पालकत्व घेण्याचे कबूल केले. प्रदूषण आणि जमिनीची धूप थांबविणे काळाची गरज आहे. फळझाडांची चांगली वाढ झाल्यानंतर फळांबरोबरच अनेक फायदे गावकऱ्यांना मिळणार आहेत.

बिरेवाडीचे सरपंच भाऊसाहेब कडनर, उपसरपंच नारायण फड, संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. के. कडलग, बिरेवाडीचे सर्व ग्रामस्थ, लायन्स क्लब संगमनेर सफायरचे सर्व सदस्य यांनी हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी मोलाची मदत केली.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!