गुणवंतांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील यशाने संगमनेरच्या लौकिकात भर — आमदार थोरात
संग्राम करिअर अकॅडमीच्या वतीने गुणवंतांचा सत्कार
प्रतिनिधी —
पारंपारिक क्षेत्रा व्यतिरिक्त करिअरसाठी इतरही अनेक क्षेत्र उपलब्ध आहेत. ज्या तरुणांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात नेत्र दीपक कामगिरी करून यश मिळवले आहे. हे यश संगमनेर साठी वैभव प्राप्त करून देणारे असून प्रत्येकाने आपल्या आवडीच्या क्षेत्रात उत्तम करिअर करावे असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

संग्राम नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने तालुक्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात यश संपादित केलेल्या गुणवंतांचा गुणगौरव सोहळा मालपाणी लॉन्स येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे हे होते. तर व्यासपीठावर माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, सुवर्णा मालपाणी, व्याख्याते गणेश शिंदे, चेअरमन डॉ. नाझीमुद्दीन शेख, व्हाईस चेअरमन राणी प्रसाद मुंदडा, डॉ. सुचित गांधी, विजय गिरी, कैलास सोमानी, सुनंदा दिघे, प्रमिला अभंग, डॉ माणिक शेवाळे, सूर्यकांत शिंदे, एम वाय दिघे, डॉ. अरविंद रसाळ, सुभाष सांगळे, नितीन अभंग, जीवन पांचरिया, निखिल पापडेजा, गौरव डोंगरे, ॲड. सुहास आहेर, ॲड. प्रशांत गुंजाळ, डॉ. नामदेवराव गुंजाळ, उमेश शिंदे आदी उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले की, प्रत्येकाने आपल्या आवडीचे क्षेत्रात करिअर केले पाहिजे. इंजीनियरिंग, मेडिकल व्यतिरिक्तही अनेक क्षेत्र आहेत. त्यामध्ये तुम्ही आत्मविश्वासाने व जिद्दीने परिश्रम घेतल्यास यश नक्की मिळेल. आंतरराष्ट्रीय पातळीवरील आयर्न मॅन स्पर्धेत संगमनेरच्या अनेक कर्तुत्वान युवकांनी यश मिळवले आहे. हा सन्मान त्यांच्या कुटुंबाबरोबर संगमनेर तालुक्याचा आहे. विविध क्षेत्रात संगमनेरचा लौकिक वाढवण्यासाठी युवकांनी पुढे आले पाहिजे. तालुक्यातील अजिंक्य रहाणे यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेटचे नेतृत्व केले. अनेक गुणवंत आहेत ज्यांच्या यशाने संगमनेरच्या वैभवात भर पडली असून तुमच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध क्षेत्रांचे सातत्याने व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात असल्याचे ते म्हणाले.

आमदार डॉ. तांबे म्हणाले की, जीवनामध्ये ध्येय निश्चित केले तर यश नक्की मिळते. प्रतिकूलतेवर मात करून अनेकांनी यश मिळवले आहे. आणि हे आपल्या सर्वांसाठी आदर्शवत आहेत. गुणवत्ता ही एका वर्गाची मक्तेदारी नसून ती सर्वसामान्यांची आहे. आपण सर्वांनी झोकून देऊन प्रयत्न केले. तर लोक तुमच्याकडे आदर्श व्यक्ती म्हणून पाहतील आणि हा तुमच्या बरोबर तुमच्या कुटुंबीयांचा सन्मान असेल. संग्राम करिअर अकॅडमीच्या माध्यमातून गुणवंतांचा होणारा हा सोहळा इतरांसाठी आदर्शवत असल्याचे ते म्हणाले.

व्याख्याते गणेश शिंदे म्हणाले की, गुणपत्रिकेवरची गुणांची सूज ही गुणवत्ता ठरत नाही. म्हणून गुणा पेक्षा गुणवत्तेला महत्त्व द्या. संकटावर मात करा. आयुष्य हे पुन्हा नसून आनंदाने जीवन जगा असा मौलिक सल्ला त्यांनी दिला. यावेळी सुवर्णा मालपाणी यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी करण राजपाल, प्रणिता सोमन, अमर नाईकवाडी, कल्याणी अहिरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. निजामुद्दीन शेख यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नामदेव कहांडळ व प्रा.गणेश गुंजाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन राणी प्रसाद मुंदडा यांनी केले. यावेळी संग्राम पतसंस्थेच्या सर्व संचालकांसह संगमनेर मधील विविध शाळांमधील विद्यार्थी व शिक्षक व नागरिक उपस्थित होते.

या गुणवंतांचा सत्कार
आयर्न मॅन स्पर्धेत – करण राजपाल, डॉ. संजय विखे, अमर नाईकवाडी,
सायकल स्पर्धेत- राजेंद्र गुंजाळ, निलेश वाघचौरे, सुभाष कु-हे, विनोद भोईर, प्रणिता सोमन,
तर एमपीएससी मध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल कल्याणी अहिरे, योजना गोरे, पूजा पयुवाल, श्वेता झावरे, अजय गवांदे यांचा सत्कार करण्यात आला.

