११ सप्टेंबर २०२२ (रविवार) रोजी गावोगावी मतदान ओळखपत्र व आधार कार्ड जोडणी शिबिराचे आयोजन !

संगमनेर महसूल विभागाचा उपक्रम

प्रतिनिधी –

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदान ओळखपत्र आधार कार्ड ला जोडण्याचा कार्यक्रम युद्धपातळीवर सुरू असून संगमनेर तालुक्यात रविवार दिनांक ११ सप्टेंबर २०२२ रोजी गावोगावी मतदान ओळखपत्र आधार कार्ड जोडण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे आणि तहसीलदार अमोल निकम यांनी दिली आहे.

‘चला जबाबदारी पार पाडूया… मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड आजच जोडुया… या घोषणेसह या उपक्रमात सुरुवात झाली आहे.

भारत निवडणूक आयोगामार्फत १ ऑगस्ट २०२२ पासून मतदार यादी शुद्धीकरण आणि मतदान कार्डला आधार क्रमांक जोडणी करण्याचा कार्यक्रम सुरु झालेला आहे. त्या अनुषंगाने आधार जोडणी शिबिराचे आयोजन करणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.

संगमनेर विधानसभा मतदार संघामध्ये याबाबत मतदार नोंदणी अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गावोगावी व मतदान केंद्र स्तरावर शिबिराचे नियोजन करण्याबाबत बैठक पार पडली असून शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. कि या दिवशी आपल्या आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व मतदारांचे मतदान कार्ड हे आधार क्रमांकाला लिंक करण्याचे काम करावे. या द्वारे सर्व मतदारांना देखील आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी आपल्या आपल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना याकामी सहकार्य करावे.

दिनांक १ ऑगस्ट २०२२ ते ८/०९/२०२२ पर्यंत संगमनेर मतदार संघातील २७६१३८ मतदारांपैकी १५२५७५ इतके मतदारांचे एकूण ५५.९७ टक्के आधार जोडणीचे कामकाज पूर्ण झालेले आहे.

राज्यात संगमनेर मतदारसंघाचे काम आघाडीवर असून मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मतदार नोंदणी अधिकारी, सहा. मतदार नोंदणी अधिकारी व सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे अभिनंदन केले.

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!