अंध असूनही त्याने स्वतः मतदान ओळखपत्र आधार क्रमांकाला लिंक केले !
प्रतिनिधी —
देशभरात मतदान ओळखपत्र आधार क्रमांकाला लिंक करण्याची मोहीम सुरू आहे. प्रशासन नागरिकांना विविध प्रकारचे आवाहन करून आधार क्रमांक आणि मतदान ओळखपत्र लिंक करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे. नगरपालिका, महसूल विभाग यात पुढाकार घेऊन हे काम कसोशीने पार पाडत आहे. संगमनेर महसूल विभाग यासाठी जिल्ह्यात आघाडी घेऊन काम करत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. नगरपालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन आधार क्रमांक मतदार ओळखपत्र ला लिंक करत आहेत.

संगमनेर विधानसभा मतदारसंघातील (वैदुवाडी ता. संगमनेर) दिव्यांग मतदार ज्ञानेश्वर शंकर लोखंडे यांनी आपले स्वतःचे मतदान ओळखपत्र आपल्या आधार क्रमांकाला लिंक केले. लोखंडे हे अंध असून त्यांनी मोबाइल मधील Talk Back या feature च्या साहाय्याने Voter Helpline App द्वारे आधार लिंक केले आहे.

निश्चितच ही बाब अत्यंत प्रेरणादायी असून सर्व मतदारांनी देखील आपले मतदान ओळखपत्र व आधार कार्ड क्रमांक लिंक करून घ्यावे. असे आवाहन संगमनेर उपविभागाचे प्रांत अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे आणि तहसीलदार अमोल निकम यांनी केले आहे.

