स्वातंत्र्य लढ्यात क्रांतीकारक, समाजसुधारक विचारवंतांचे मोठे योगदान – डॉ. जयश्री थोरात

निमगांव जाळी येथे माजी सैनिक, गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार, कामगारांना साहित्य वाटप

प्रतिनिधी —

भाारत हा खंडप्राय देश असून येथे विविध भाषा, जाती, धर्म, पंथाचे लोक एकत्र गुण्या गोविंदाने नांदत आहेत. आपल्या देशाची वाटचाल विकासाकडे सुरु आहे. भारत देशाला पारतंत्र्यातून स्वातंत्र्य मिळवून देण्यात अनेक क्रांतीकारक, समाजसुधारक, विचारवंत यांचे मोठे योगदान आहे. असे प्रतिपादन एकविरा फाऊंडशेनच्या अध्याक्षा जयश्री थोरत यांनी केले आहे.

आज निमगाव जाळी येथे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वामनराव जोंधळे सेवाभावी संस्थेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त माजी सैनिकांचा सन्मान सत्कार, गुणवंत विद्यार्थी सन्मान सत्कार तसेव बांधकाम कामगारांना साहित्य संचचे वाटप कार्यक्रम एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक डॉ. जयश्री थोरात यांच्या हस्ते संपन्न झाला. अध्यक्षस्थानी वसंतराव जोंधळे होते. तर व्यासपीठावर पंचायत समिती उपसभापती नवनाथ अरगडे, राजहंस दूध संघाचे व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर, राजहंस दूध संघ संचालक प्रतिभा जोंधळे, जिल्हा खरेदी विक्री संघाच्या माजी संचालिका आशा जोंधळे, बांधकाम कामगार काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे, विजय हिंगे, शेतकी संघाचे माजी संचालक राम तांबे, चिंचपूर चे सरपंच विवेक तांबे, उपसरपंच अनिल थेटे, निमगाव वि. का. सोसायटी चे माजी चेअरमन रंगनाथ वदक, माजी सरपंच बाळासाहेब जोंधळे, माजी उपसरपंच डॉ. सुरेश जोंधळे सोमनाथ जोंधळे आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जयश्री थोरात म्हणाल्या कि, देशाला स्वातंत्र मिळवून देण्यात सर्वांचेच मोलाचे योगदान आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला आदर्शवत राज्यघटना दिली, महात्मा गांधी यांनी समाजाला सत्य व अहिंसेची शिकवण दिली. तर चंद्रशेखर आझाद, भगतसिंह यांनी अन्यायाविरुद्ध क्रांतीचा नारा दिला. काँग्रेस पक्षाचेही स्वातंत्र्यात मोठे योगदान राहिले आहे. तालुक्यात आमदार थोरात यांच्या नेतृत्वामुळे अनेक विकासात्मक बदल घडले असून समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम सुरु आहे. त्यातूनच आज असंघटीत कामगारांना साहित्या बरोबरच विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जात असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.  यावेळी नवनाथ अरगडे, प्रतिभा जोंधळे यांचीही भाषणे झाली.

यावेळी विठ्ठल असावा, सुखदेव डेंगळे, परशुराम जोंधळे, दत्ता डेंगळे, माऊली डेंगळे, अशोक डेंगळे, भाऊसाहेब वदक, सोमनाथ खरात, तान्हाजी जोंधळे, रवींद्र खरात, प्रकाश जोंधळे, निलेश तांबे, एकनाथ खरात, दिगंबर डेंगळे, सुनील टिळेकर, मंगेश अरगडे, अशोक डेंगळे, गणेश वदक, मोहन वदक, कमलेश जोंधळे, विजय जोंधळे, महेश जोंधळे, कमलेश जोंधळे, दीपक जोंधळे, दगडू तांबे, लक्षीमन बिडवे, प्रवीण जोंधळे, किरण जोंधळे राजेंद्र वदक जनसेवक संजय वर्पे, बाळासाहेब गायकवाड,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ जोंधळे यांनी केले तर आभार संदीप जोंधळे यांनी मानले. सूत्रसंचलन जितेंद्र जोंधळे सर यांनी केले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!