संगमनेरात दीड लाखासाठी सुनेचा छळ ; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
प्रतिनिधी –
जागा घेण्यासाठी माहेरहून दीड लाख रुपये आणावेत यासाठी विवाहितेचा वेळो वेळी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी पती, सासरा, सासू, दीर या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सोमनाथ दामोदर जाधव (पती), पुष्पा दामोदर जाधव (सासू), दामोदर मुरलीधर जाधव (सासरे), अमोल दामोदर जाधव (दिर ) सर्व रा.पनोडी ता. संगमनेर.

हर्षदा सोमनाथ जाधव (रा. साईबन कॉलनी, जाणता राजा मैदान शेजारी, शिवाजीनगर, संगमनेर) या विवाहितेने या चौघांविरुद्ध फिर्याद दिली असून जागा घेण्यासाठी माहेरहून दीड लाख रुपये आणावेत म्हणून वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करून त्रास दिला असे म्हटले आहे.
वरील चौघां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस नाईक धींदळे हे करीत आहेत.

