संगमनेर शहर पोलिसांनी ४०० किलो गोवंश मांस पकडले 

प्रतिनिधी —

संगमनेर शहरातील रहेमत नगर मधील मौलाना आझाद मंगल कार्यालयाच्या पाठीमागे संगमनेर शहर पोलिसांनी २६ तारखेला रात्री छापा घालून ४०० किलो गोवंश मास व वाहतूक करण्यासाठी वापरली जाणारी एक पिकप जीप असा ३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सलमान बाबाजी सय्यद (वय 27 वर्षे रा. आंबी खालसा, तालुका संगमनेर, हल्ली मुक्काम रहेमत नगर संगमनेर) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस शिपाई कानिफनाथ दत्तात्रय जाधव यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी या परिसरात छापा टाकला असता गोवंश कत्तल केलेले मांस पिकअप जीप मध्ये भरून ठेवण्यात आलेले होते. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल हस्तगत केला असून गुन्हा दाखल केला आहे.

संगमनेर शहरात सुरू असलेले गोवंश कत्तलखाने बंद नसल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे.

 

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!