संगमनेर तालुका ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वृक्षारोपण उपक्रमाचा शुभारंभ !
प्रतिनिधी —
संगमनेर तालुका ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने कार्यान्वीत करण्यात आलेल्या १ हजार वृक्षारोपण व संगोपन उपक्रमाचा शुभारंभ शहरातील सौ. न. सो. कळसकर प्राथमिक विद्यालयात उत्साहात करण्यात आला.
यावेळी महासंघाचे अध्यक्ष सोमनाथ तात्याबा कळसकर गुरुजी, कार्याध्यक्ष डॉ. एस.जी. सातपुते, दैनिक युवावार्ताचे संस्थापक किसन भाऊ हासे, सचिव नंदकिशोर बेल्हेकर, उपाध्यक्ष गणेशलाल बाहेती, रत्नाकर पगारे, कोषाध्यक्ष सुरेश जाजू व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

उपस्थितांचे स्वागत गणेशलाल बाहेती यांनी केले. तर या उपक्रमाविषयी माहिती देतांना किसन भाऊ हासे यांनी सांगीतले की, वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. पुढील पिढीसाठी एक सुरक्षा कवच ज्येष्ठ नागरिकांनी तयार करायचे आहे. फक्त वृक्षारोपण करुनच थांबायचे नसुन पाच वर्षे त्याचे संगोपन करायचे आहे. ज्येष्ठ नागरिकांकडे असलेले अनुभव आपल्याला या उपक्रमासाठी वापरायचे आहेत.
की
कळसकर गुरुजी म्हणाले की, संगमनेर येथील ज्येष्ठ नागरिक संघटनांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे सोडविण्यासाठी एकत्र येत संगमनेर तालुका ज्येष्ठ नागरिक महासंघाची स्थापन केली आहे. या महासंघामध्ये संगमनेर तालुका ज्येष्ठ नागरिक संघ व संघाच्या ग्रामीण भागातील ११ उपशाखा, महेश ज्येष्ठ नागरिक संघ, राजहंस ज्येष्ठ नागरिक संघ व ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी सेवाभावी संस्था, गणेशनगर यांचा समावेश आहे. या सर्वांच्या सहभागाने तयार झालेल्या या महासंघाने अगदी कमी कालावधीत अनेक कामे केलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी फक्त स्वतःकरता न जगता आपल्या पुढील पिढीसाठी, समाजसेवेसाठी काहीतरी करायला पाहिजे हा उद्देश घेऊन सध्या होत असलेला पर्यावरणाचा र्हास, पावसाचे कमी प्रमाण यावर असलेला पर्याय म्हणजे वृक्षारोपण. त्यासाठी महासंघाने १ हजार वृक्षारोपण करुन त्यांचे पाच वर्षे संगोपन करण्याचा संकल्प केला आणि आज या संकल्पाचा शुभारंभ आपण केलेला आहे. आजपासून या उपक्रमाची खर्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. आपण सर्वजण चिकाटीने तरुणांच्या मदतीने हा उपक्रम यशस्वी करणार आहोत.

याप्रसंगी कळसकर विद्यालयाच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास डी.बी. राठी, चारुदत्त काटकर, जयप्रकाश लाहोटी, ज्ञानेश्वर गोंटे, मंगला पाराशर, रावसाहेब पारासुर, विठ्ठल रहाणे, काशिनाथ हांडे, अर्जुन वाघ, रत्नाकर पगारे, एकनाथ गुंजाळ, नारायण उगले, शंकर काशीद, भाऊसाहेब मांडे, सुश जाजू, केदारनाथ तापडे, विजय भुतडा, द. सा. रसाळ, कळसकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पानसरे, सातपुते, कासार, वडीतके , घाडगे आदी उपस्थित होते.

