दुर्गाताई तांबे यांना राज्यस्तरीय जिजाऊ गौरव पुरस्कार
प्रतिनिधी —
संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा व जयहिंद महिला मंचच्या अध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी महिला बचतगटाच्या माध्यमातून महिला सबलीकरण, समाजकारण,शिक्षण, व पर्यावरण या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कामगिरी बद्दल महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेड तर्फे राज्यस्तरीय जिजाऊ गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
धुळे येथे महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेड तर्फे झालेल्या पहिल्या राज्यस्तरीय ग्रामीण अधिवेशनात तांबे यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी व्यासपीठावर सुनंदा पवार, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा माधुरी भदाणे ,अर्जुन तनपुरे अमळनेर च्या ॲड. ललिता पाटील आदींसह उपस्थित होते.

मराठा सेवा संघ आयोजित जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने धुळे येथे झालेल्या पहिल्या राज्यस्तरीय ग्रामीण अधिवेशनात हा मानाचा पुरस्कार तांबे यांना शानदार कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
जयहिंद युवा मंचच्या माध्यमातून युवकांना प्रोत्साहन देत निरोगी व निकोप समाज निर्मितीचे काम हाती घेतले आहे. संगमनेर शहरासाठी पायाभूत विकासाच्या अनेक योजना राबविल्या आहे. सामाजिक क्षेत्रात सार्वजनिक स्वच्छतेसाठी विविध उपक्रम हाती घेतले आहे. गोरगरीब व अपंगासाठी विशेष योगदान त्यांनी दिले आहे. उत्तर महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रबोधनवर व्याख्याने देत महिला सबलीकरणाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. त्याच बरोबर जात्यावरील ओव्या संकलित करून त्यांनी केलेल्या पुस्तिकेच्या सहा आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.

त्यांच्या या कामांची दखल घेत त्यांना यापूर्वी विविध संस्थांतील बुलढाणा येथील स्व.विलासराव देशमुख प्रतिष्ठानचा राजयस्तरीय सावित्री पुरस्कार, फिलीकस फौंडेशनचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार, तेजस्वीनी पुरस्कार, वीरभारती पुरस्कार, स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान पुणे पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार यशवंत वेणू पुरस्कार आदिं सह सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
याप्रसंगी तांबे म्हणाल्या की, हा पुरस्कार संगमनेर तालुक्यातील महिला व नागरिक बंधूंचा असून या पुरस्कारामुळे काम करण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळणार आहे आपण सातत्याने समाजाच्या विकासासाठी योगदान देत असून यापुढेही काम करत राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
