ज्येष्ठ पत्रकार प्रकाश टाकळकर, कॉ. कारभारी उगले व जितीन साठे यांना रोटरी जीवन गौरव पुरस्कार जाहीर 

प्रांतपाल डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे यांच्या हस्ते मंगळवारी अकोले येथे पुरस्कार वितरण सोहळा

प्रतिनिधी — 

रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल च्या वतीने देण्यात येणारा रोटरी जीवन गौरव पुरस्कार अकोले तालुक्यातील सामाजिक,राजकीय चळवळीतील ज्येष्ठ नेते कॉ. कारभारी उगले, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश टाकळकर व बाएफ चे नाशिक विभागीय अधिकारी जितीन साठे यांना जाहीर झाले आहेत.

हा पुरस्कार प्रदान   सोहळा अकोले महाविद्यालयाच्या कै. के.बी.दादा देशमुख सभागृहात  मंगळवार दिनांक २६ एप्रिल २० रोजी सकाळी ९.३० वाजता  रोटरीचे प्रांतपाल रो.डॉ.ओमप्रकाश मोतीपवळे यांच्या हस्ते व रोटरी क्लब अकोले सेंट्रल चे अध्यक्ष सचिन आवारी यांच्या अध्यक्षतेखाली  आयोजित करण्यात आला असल्याची माहिती रोटरी क्लबचे  सचिव प्रा.डॉ.सुरींदर वावळे यांनी दिली.

यावेळी रोटरी चे  उपप्रांतपाल दिलीप मालपाणी, पब्लिक इमेजचे डिस्ट्रिक्ट सल्लागार अमोल वैद्य, सचिव प्रा.डॉ.सुरींदर वावळे, उपाध्यक्ष संदीप दातखिळे, खजिनदार गंगाराम करवर  हे उपस्थित राहणार आहेत.

कॉ. उगले अर्ध शतकापेक्षा जास्त काळ राजकीय, सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. विविध चळवळी च्या माध्यमातून त्यांनी मुख्यतः विडी  कामगार, शेतकरी, शेत मजूर  यांना न्याय मिळवून  दिला आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून त्यांनी तालुका पातळी पासून जिल्हा, राज्य व देश पातळीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.

ज्येष्ठ पत्रकार माजी प्राचार्य प्रकाश टाकळकर ३० वर्षापेक्षा अधिक काळ पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी शिक्षण व पत्रकारिता यांचा योग्य समन्वय साधून दोन्ही क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविला. तालुक्याच्या संदर्भात त्यांनी विपुल प्रमाणात लेखन केले आहे. आदिवासी भागातील शाळेत ३० वर्षे काम करताना प्राचार्य पदाच्या काळात त्यांनी विद्यालयात अनेक उपक्रम राबविले. सामाजिक व प्रामाणिक पत्रकारितेचा ते पत्रकारांसाठी आदर्श आहेत.

तसेच बाएफ चे नाशिक विभागीय अधिकारी जीतीन साठे यांनी आदिवासी भागातील महिला बचत गट चळवळीच्या तसेच बायफ च्या माध्यमातून कृषी विषयक अनेक उपक्रम राबविले. बीजमाता राहीबाई पोपरे यांच्या मार्गदर्शनाखाली परसबाग चळवळ आता राज्यभर पोहचली त्या मागे साठे यांची प्रेरणा व मार्गदर्शन आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकर्नाचे उपक्रम राबविताना त्यांच्या मार्गदर्शनामुळे ममता भांगरे, शांता धांडे या आदिवासी महिलांना राज्य, राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळाले राहीबाई पोपरे यांचे कार्य समाजापुढे आणून त्यांना पदमश्री मिळवून देण्यापर्यंत मार्गदर्शन करणारे  जितीन साठे यांचा रोटरी जीवन गौरव पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे.

या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन रोटरी क्लबचे संचालक मंडळ व सर्व सदस्य यांनी केले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!