संगमनेर तालुक्यातील असंघटित कामगारांना मिळणार विविध योजनांचा लाभ

यशोधन कार्यालयात १ हजार असंघटित कामगारांना साहित्य व कार्डचे वाटप
प्रतिनिधी —
महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण विभागामार्फत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून असंघटित काम गारांसाठी देणाऱ्या देण्यात येत असणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी
महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळा च्या वतीने देण्यात येणारे ओळखपत्र वाटप करण्याचे शिबिर आयोजित केले होते. या शिबिराला तालुक्यातून आलेल्या असंघटित कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून १ हजार कामगारांनी याचा लाभ घेतला आहे.

असंघटित कामगारांना ओळखपत्र तसेच साहित्य वाटप करण्याच्या संदर्भात नोंदणी करण्यासाठी महसूल मंत्री थोरात यांच्या यशोधन या संपर्क कार्यालयात दिनांक २५ जानेवारी ते २७ जानेवारी या कालावधीत करिता असंघटित कामगारांसाठी शिबिराचे आयो जन करण्यात आले आहे. या शिबिराच्या पहिल्याच दिवशी तालुक्यातून आलेल्या असंघटित कामगारांनी नाव नोंदणीकरून आपले ओळखपत्र घेण्यासाठी यशोधन कार्यालयाच्या बाहेर एकच गर्दी केली होती.

असंघटित कामगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे हे स्वतः असंघटित कामगारांमध्ये उभे राहून त्यांना नाव नोंदणी साठी येणाऱ्या अडचणी व कागदपत्रांची जुळवणूक करण्यासाठी मदत करत होते. त्या कॅम्पसाठी १००० कार्ड व १००० साहित्य वाटप, योजनेतून असंघटित कामगारांना पहिल्या मुलीच्या लग्नासाठी ५१ हजार रुपये रोख, मुलांना शिक्षणाला मदत तसेच नोंदणी केल्यानंतर दहा हजार रुपये किमतीचे साहित्य तातडीने देण्यात येणार आहे.

बांधकाम कामगार कामावर असताना काही कळत नकळत एखादी अपरिहार्य घटना घडली तर त्यासाठी पाच लाख रुपयांची मदत तातडीने देण्यात येणार आहे. इयत्ता पहिली ते सातवी पर्यत तसेच पदवीपर्यंत पर्यंत तसेच डिप्लोमा साठी 40 हजार रुपये इंजिनिअरिंग डिग्रीसाठी 60 हजार रुपये एम बी बी एस साठी 1 लाख रुपये अशा विविध योजना या कामगारांना मिळणार आहेत्.

हा सर्व पाठपुरावा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच यशोधन कार्यालयाचे प्रमुख कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे असंघटित कामगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे यांनी सांगितले.
