यशोधन कार्यालयाचा आदिवासी भिल्ल कुटुंबास मदतीचा हात

प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील कोंची येथील भिल्ल आदिवासी कुटुंब सिंधुबाई बाळासाहेब माळी यांच्या घराचे जळीत झाल्याने त्यांचे संसारउपयोगी साहित्य, धान्य, कपडे आगीत जळून खाक झाले. त्यांचा संसार उघड्यावर पडला. ही बातमी कळताच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयाच्या वतीने सिंधुबाई माळी यांच्या कुटूबियांची आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात यांनी भेट घेतली. यावेळी समवेत जनसेवक कैलास मोकळ, सरपंच अमृता जयराम भास्कर, उपसरपंच सोमनाथ जोंधळेे, ग्रामसेवक रमेश भालेराव उपस्थित होते.

यशोधन संपर्क कार्यालयाचे प्रमुख इंद्रजीत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कोंची येथील भिल्ल आदिवासी कुटुंब सिंधुबाई बाळासाहेब माळी यांना संसारोपयोगी साहित्य, किराणा, पाण्याची टाकी, संसारोपयोगी भांडी, चादर, टॉवेल, सतरंजी आदि साहित्य उपस्थितांच्या हस्ते देण्यात आले. जळील झाल्याने घराचे विदारक दृश्य पाहिल्यावर सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले. घर जळून खाक झाल्याने त्यात सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या कुटुंबातील बाळूबाई भागवत माळी या आजीचे जळीतात दु:खद निधन झाले. त्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. आजीच्या दु:खद निधनाबद्दल यशोधन परिवाराच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी येष्ठ कार्यकर्ते भानुदास भास्कर, सोपान जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण गीते, जि प शाळा मुख्याध्यापक सुमन सातपुते, जयराम भास्कर, नानासाहेब लहू जगताप, आशा सेविका संगीता जोंधळे, बेबी जोंधळे, किरण माळी, विमल माळी, रवींद्र मोकळ आदी उपस्थित होते.
