कर्तव्यम् फाऊंडेशनला रक्त मित्र पुरस्कार प्रदान !

प्रतिनिधी —
संगमनेर येथील कर्तव्यम् फाऊंडेशनला नाशिक येथील अर्पण थॅलेसेमिया सोसायटी आणि अर्पण रक्त केंद्र यांच्या वतीने ‘रक्त मित्र’ पुरस्कार मुंबई येथील जीतो लेडीज विंग, जीतो अपेक्सच्या अध्यक्षा सुनीता बोहरा व अर्पण थॅलेसेमिया सोसायटीचे अध्यक्ष डॉ. एन. के. तातेड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या पुरस्कार वितरण सोहळ्यास चिन्मय उद्गिरकर (सुप्रसिद्ध अभिनेता), प्रमुख उपस्थिती डॉ. निलेश वासेकर (सुप्रसिद्ध हिमॅटोलॉजीस्ट), डॉ. सिद्धेश कलंत्री (सुप्रसिद्ध हिमॅटोलॉजीस्ट), (अध्यक्ष, ), डॉ. अतुल जैन (सेक्रेटरी, अर्पण थॅलेसेमिया सोसायटी), डॉ. वर्षा उगांवकर (कार्यकारी संचलिका, अर्पण थॅलेसेमिया सोसायटी), नाशिक अर्पण ब्लड बँकेचे व्यवस्थापक आर.के. जैन व संगमनेर अर्पण बँकेच्या व्यवस्थापक प्रमिला कडलग आदी उपस्थित होते.

कर्तव्यम् फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तुषार शरद ओहरा यांच्या संकल्पनेतून गरजू रुग्णांना त्वरित रक्त पुरवठा करण्याची मोहीम हाती घेतली. २०१५ मध्ये या फाऊंडेशनची स्थापना झाली. त्यांनतर विविध ब्लड बँक तसेच हॉस्पिटल यांच्या रक्तासाठी मागणी होवु लागली. महाराष्ट्रतील विविध जिल्ह्यामध्ये गरजू रुग्णांना कर्तव्यम् फाऊंडेशनने रक्त पुरविले आहे. त्याचबरोबर दिल्ली, हैद्राबा, गुजरात या ठिकाणी देखील अनेक रुग्णांना रक्त पुरवठा केला आहे.

कोविड संक्रमणाच्या काळातही फाऊंडेशनने प्लाझ्मा संकलन मोहीम राबवून जवळपास चारशे पिशव्यांचे संकलन केले होते. या कार्याची दखल घेत नाशिक येथील अर्पण थॅलेसेमिया सोसायटी आणि अर्पण रक्त केंद्र यांच्या वतीने रक्त मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी कर्तव्यम् फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तुषार ओहरा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
