अजिंक्य कला व क्रीडा संवर्धन मंडळाच्या उन्हाळी शिबिरांना उत्साहात सुरुवात !

प्रतिनिधी —

मंडळाचे वतीने आयोजित क्रिकेट प्रशिक्षण, बाल संस्कार, नाट्य प्रशिक्षण आणि बुद्धिबळ या चार शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

आज सकाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन मीनानाथ पांडे, वसंत मणकर आणि जेष्ठ पत्रकार विजय पोखरकर यांचे हस्ते करण्यात आले.

या प्रशिक्षण वर्गात २४ प्रशिक्षनार्थी सहभागी झाले आहेत. उद्या आणखी संख्या वाढेल, असे आयोजकातर्फे सांगण्यात आले. हे प्रशिक्षण सिझन बॉलवर देण्यात येणार असून, उच्च दर्जाच्या आणि अनुभवी माजी क्रिकेट खेळाडूंचे मार्गदर्शन शिबिरार्थीना मिळणार आहे. या उपक्रमाचे प्रमुख म्हणून नितीन बाणाईत, विनायक दैवज्ञ, हेमंत दराडे, अभय विसाळ, निलेश देशमुख हे आहेत. या उदघाटन कार्यक्रमास बाळासाहेब नाईकवाडी, सयाजी पोखरकर, एकनाथ शेळके, सचिन शिंदे उपस्थित होते.

बाल संस्कार वर्गाचे उदघाटन मंडळाचे अध्यक्ष के.डी. धुमाळ आणि अरुण रुपवते यांच्या हस्ते पार पडले. सरस्वती पूजन आशा बापट यांनी केले. या शिबिराची जबाबदारी उमा कुलकर्णी, नीरजा कुलकर्णी, स्मिता मुंदडा, सोनल मालवणकर, जयश्री मुंदडा, रेखा धर्माधिकारी आणि आशा बापट या सदस्य संभाळीत आहेत. आजच्या दिवशी १० प्रशिक्षनार्थी सहभागी झाले होते.

बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन डॉ.संदीप कडलग यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी विनायक दैवज्ञ, राजेंद्र राठोड, सतीश मालवणकर, नितीन बाणाईत उपस्थित होते. प्रशिक्षण वर्गास ओम बाणाईत आणि मडके सर मार्गदर्शन करणार आहेत. या वर्गास १५ प्रशिक्षनार्थी उपस्थित होते.

आज संध्याकाळी नाट्य प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन होणार आहे.

या पूर्ण कार्यक्रमास सतीश मालवणकर, राजेंद्र राठोड, अभय विसाळ, सौरभ शाह, निलेश देशमुख, स्मित मालवणकर आणि श्यामसुंदर मुंदडा, ओम बाणाईत, प्रतीक मुंदडा हे मंडळाचे सदस्य हे उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!