ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षपदी कळसकर गुरुजी यांची निवड

प्रतिनिधी —

संगमनेर शहर व तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणार्‍या संस्थांची एकत्रीत संस्था असलेल्या संगमनेर तालुका ज्येष्ठ नागरिक महासंघाची नूतन कार्यकारीणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून या महासंघाच्या अध्यक्षपदी राष्ट्रपती पारितोषीक विजेते, संगमनेर तालुका पेन्शनर असोसीएशनचे अध्यक्ष सोमानाथ तात्याबा कळसकर गुरुजी यांची तर कार्याध्यक्षपदी डॉ. सोमनाथ सातपुते यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर इतर पदाधिकार्‍यांचीही यामध्ये निवड करण्यात आली आहे.

संगमनेर येथील ज्येष्ठ नागरिक संघटनांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे सोडविण्यासाठी एकत्र येत संगमनेर तालुका ज्येष्ठ नागरिक महासंघाची स्थापन केली आहे. या महासंघामध्ये संगमनेर तालुका ज्येष्ठ नागरिक संघ व संघाच्या ग्रामीण भागातील ११ उपशाखा, महेश ज्येष्ठ नागरिक संघ, राजहंस ज्येष्ठ नागरिक संघ व ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी सेवाभावी संस्था, गणेशनगर यांचा समावेश आहे. या महासंघाची वार्षीक बैठक १९ एप्रील रोजी पेन्शनर भवन येथे पार पडली. त्यावेळी नुतन कार्यकारीणीची निवड करण्यात आली.

यावेळी सो.ता. कळसकर गुरुजी यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करुन महासंघाचे महत्व उपस्थितांना पटवून दिले. ते म्हणाले की, आपल्या सर्व वेगवेगळ्या ज्येष्ठ नागरिक संघटनांचे कार्य सुरु आहे. परंतू आपल्याला तालुका पातळीवर एकत्र येऊन ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्‍नांसाठी प्रभावीपणे काम करण्यासाठी हा महासंघ आहे. संघटित होऊन संघर्ष केल्याशिवाय प्रशासन काम करीत नाही त्यामुळे आपल्याला महासंघात राहून काम करावयाचे आहे.

यावेळी माजी अध्यक्ष डॉ. एस.जी. सातपुते यांनी ज्येष्ठ नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत. त्यावर त्यांची मते मागण्यासाठी, मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आपण संघटीत झालो आहोत असे प्रतिपादन केले. तर डॉ. शेख जी.पी. यांनी गोवा व हैदराबाद येथील ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यवाहीबाबत माहिती दिली. यावेळी उपस्थितांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.

याच सभेमध्ये महासंघाची नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या नुतन कार्यकारणी नुसार अध्यक्षपदी कळसकर गुरुजी यांची तर कार्याध्यक्षपदी डॉ. एस.जी. सातपुते यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी डॉ. जी.पी. शेख, रत्नाकर पगारे, गणेशलाल बाहेती यांची, कोषाध्यक्षपदी सुरेश जाजू, सचिवपदी नंदकिशोर बेल्हेकर, सहसचिव पदी शंकर सहादू काशीद, कायदेविषयक सल्लागार अ‍ॅड. भाऊसाहेब हांडे, लेखा परिक्षकपदी ओंकार राठी, मनोहर देशपांडे, प्रसिध्दीप्रमुखपदी चारुदत्त काटकर यांची निवड करण्यात आली. तर संचालक मंडळावर व्दारकानाथ राठी, जयप्रकाश बाहेती, सोमनाथजी सोमाणी, एस.बी. घबाडे, मंगला पाराशर, प्रा. ज्ञानेश्‍वर गोंटे, एकनाथ गुंजाळ, नारायण उगले, भाऊसाहेब मांडे, प्रा. शिवाजी शेवंते, विठ्ठलराव सोनवणे, श्री. गांधी, वसंत मणीयार यांची नियुक्ती करण्यात आली. या नुतन कार्यकारीणीचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!