क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुलेंमुळे समतेची शिकवण — आमदार डॉ. सुधीर तांबे
संगमनेर मध्ये महात्मा फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी

प्रतिनिधी —
थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांनी सर्वप्रथम शेतकरी, शोषित, वंचित यांच्या प्रश्नांना वाचा फोडून समतेसाठी लढा दिला. त्यांचे जिवनकार्य हे सर्व भारतीयांना सदैव प्रेरणादायी आहे. उपेक्षित वर्गाला गुलामीच्या जोखडातून मुक्त करुन पुरोगामी विचार देणाऱ्या क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुलेंमुळे देशाला समतेची शिकवण मिळाली असल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे.

क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त माळीवाडा येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, सत्यजित तांबे, विश्वासराव मुर्तडक, बाबा ओहोळ, दिलीप पुंड, धनंजय डाके, किशोर टोकसे, किशोर पवार, गजेंद्र अभंग, नितीन अभंग, बाळासाहेब पवार, निर्मला अभंग, माधव भरितकर उपस्थित होते. यावेळी यशोधन कार्यालयातही महात्मा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.

यावेळी आ.डॉ.तांबे म्हणाले कि, महात्मा जोतिबा फुले हे आधुनिक महाराष्ट्राचे जनक मानले जात असून समानता व स्त्री शिक्षणासाठी त्यांनी खुप मोठे कार्य केले. शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे महत्वाचे साधन आहे. शिक्षणाच्या प्रचारासाठी त्यांनी तत्कालीन जुन्या परंपरा मोडीत काढून सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देवून पहिल्या स्त्री शिक्षीका बनविले. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडून ब्रिटीशांपुढे शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.

श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या महात्मा जोतिबा फुले यांनी समतेचा पुरोगामी विचार देशाला दिला. अंधश्रध्दा निर्मुलन, सतीची चालबंदी, केशवपण बंदी यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. सामाजिक विषमता नष्ट करुन समाजात समता निर्माण करण्याचे मोठे काम त्यांनी केले आहे. देशातील लोकशाही वाचवण्यासाठी प्रतिगामी शक्तींचे विचार मोडून काढण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांचे समतेचे पुरोगामी विचार तरुणांनी आचारणात आणले पाहिजे असे ही ते यावेळी म्हणाले.

दुर्गा तांबे म्हणाल्या कि, बहुजन समाजाला अज्ञान, दारिद्र्य व सामाजिक विषमतेतून बाहेर काढण्याचे मोठे काम महात्मा फुले यांनी केले आहे. समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण हे अत्यंत महत्वाचे असून प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे. स्त्री शिक्षण, ग्रामीण भागातील मुलांसाठी शिक्षण या प्रमुख मागण्या घेवून त्यांनी आयुष्यभर काम केले. याचबरोबर पारंपारिक अंधश्रध्देच्या जोखडातून बहुजन समाजाला मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले. समाज प्रगतीसाठी महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यभर काम केले. परिवर्तनशील, विज्ञाननिष्ठ व क्रांतीकारी विचार समाजाला दिले. आजच्या स्त्री शिक्षण व समाजाच्या प्रगतीत त्यांचे मोठे योगदान असल्याचे ही त्या यावेळी म्हणाले.

तर यशोधन कार्यालयात काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष सुरेश झावरे, आदिवासी सेवक प्रा.बाबा खरात, पूंजाहरी दिघे, शिवाजी जगताप, भास्कर खेमनर, विजय हिंगे, शशिकांत दळवी,अनिल सोमनी, संतोष कर्पे, बाळासाहेब हांडे, मच्छिंद्र ढवळे,जालिंदर वाकचौरे,सुजित पंधारे आदी उपस्थित होते.
