संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या तुरुंगात आरोपींची आरोपीला मारहाण !

चार आरोपींवर गुन्हा दाखल
प्रतिनिधी —
संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असणाऱ्या तुरुंगातील आरोपींनी एका आरोपीला बेदम मारहाण करण्याची घटना घडली आहे. या संदर्भाने संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.

संगमनेर शहर पोलिस ठाण्यात अंतर्गत असणाऱ्या तुरुंगात बरॅक नंबर २ मध्ये अटकेत असलेले आरोपी यांच्यात एकमेकात भांडणे होऊन यातील चार आरोपींनी एका आरोपीला बेदम मारहाण केली आहे.

न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी अलीराज शब्बीर शेख यास लॉकअप मध्ये बसण्याच्या कारणावरून मारहाण करून दुखापत केली असल्याची फिर्याद पोलिसांनी दिली असून यासंदर्भात गुन्हा दाखल झाला. पोलीस उपअधीक्षक राहुल मदने तसेच पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

सदरची घटना ३० मार्च रोजी घडलेली असली तरी या संदर्भाची फिर्याद ४ एप्रिल रोजी देण्यात आल्याने नंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल आहे. घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार आनंदा संतू भांगरे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

संदीप सुखदेव हजारे, जानकू लिंबाजी दुधावडे, विविक गोरक्षनाथ कोल्हे, गोरक्ष संजय यादव या लॉकअप मधील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संगमनेर शहर पोलिस स्टेशन मधील लॉकअप नंबर २ मध्ये सदर आरोपींनी बसण्याच्या कारणावरून शेख यास बेदम मारहाण केली होती. याची गंभीर दखल घेत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

