अंगणवाडी व आशा सेविकांची एसएमबीटी हॉस्पिटल मध्ये मोफत आरोग्य तपासणी

एकविरा फाउंडेशनच्या पुढाकारातून महिलांच्या मोफत आठ तपासण्या
प्रतिनिधी —
डॉ.जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून तालुक्यातील आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका व मदतनीस यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी आरोग्य कार्ड देण्यात आले असून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून या सर्व महिला भगिनींच्या एसएमबीटी हॉस्पिटल येथे मोफत विविध तपासण्या करण्यात आल्या आहेत.

यशोधन जनसंपर्क कार्यालय येथून दर शनिवारी एसएमबीटी हॉस्पिटल च्या बसमधून तालुक्यातील विविध आरोग्य सेविका, आशा व अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना मोफत तपासणीची व्यवस्था मंत्री थोरात यांनी उपलब्ध करून दिली आहे.

यानुसार तालुक्यातील ५४ अंगणवाडी सेविका व आशा सेविका ह्या धामणगाव नंदी हिल येथील एस एम बी टी हॉस्पिटल मध्ये विविध तपासणी करण्यासाठी गेल्या. यावेळी समवेत डॉ. जयश्री थोरात, डॉ. हसमुख जैन, ज्योती थोरात आदीं उपस्थित होते.

कोरोना संकटात चांगले काम केल्याबद्दल एकविरा फाउंडेशन च्या वतीने आरोग्यसेविका अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना कौतुक सोहळ्यात गौरविण्यात आले. यावेळी मंत्री थोरात यांनी या सर्व महिला भगिनींची व त्यांच्या जवळील नातेवाईक एक महिलेची एसएमबीटी हॉस्पिटल मार्फत मोफत तपासणी करण्यात येईल. यासाठी बसची सुविधा ही दर शनिवारी उपलब्ध करून देण्याची सूचना संबंधितांना केल्या होत्या. थायरॉईड, सोनोग्राफी, हिमोग्लोबिन यांसह विविध १० तपासण्या केल्या जातात.

डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या की, महिला ही कुटुंबाचा आधार असते. महिलांचे आरोग्य चांगले असेल तर कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते. म्हणून महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढावे. त्यांचे आरोग्य चांगले राहावे. यासाठी एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून काम होत आहे. संगमनेर तालुक्यातील आरोग्य सेविका, अंगणवाडी, आशा सेविका यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना विविध तपासण्या साठी सुविधा करून दिली आहे. यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये ५४ महिला असून दर शनिवारी या महिलांसाठी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

