अकोले ग्रामीण रुग्णालय रुग्णसेवेत जिल्ह्यात उत्कृष्ट — प्रा. खांडगे
प्रतिनिधी —
अकोले ग्रामीण रुग्णालयात मागील वर्षभरात ५६६ महीला प्रसुती व १२० सिझर ,व इतर शस्त्रक्रिया झाल्या असुन जिल्ह्यात सर्वाधिक प्रसुती अकोले ग्रामीण रुग्णालयात झालेल्या आहे. एकुणच जिल्ह्यात सर्वाधिक उत्कृष्ट काम अकोले ग्रामीण रुग्णालयाचे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॅाग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष व रुग्णालय समितीचे आमदार प्रतिनिधी प्रा.सुरेश खांडगे यांनी व्यक्त केले.

अकोले ग्रामीण रुग्णालयाची रुग्णकल्याण समितीची आढावा बैठक आमदार प्रतिनिधी प्रा.सुरेश खांडगे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॅा.बाळासाहेब मेहेत्रे, वैद्यकीय अधिकारी डॅा.सुनिल सांळुके, डॅा.राहुल कवडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॅा.श्यामकांत शेटे व्यासपीठावर उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रा.खांडगे म्हणाले कि, अकोले ग्रामीण रुग्णालयाचे काम जिल्ह्यात उल्लेखनीय आहे. रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक व स्वतः स्त्रीरोग तज्ञ सर्जन असलेले डॅा.बाळासाहेब मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात महिलांच्या आजारावर उपचार केले जातात. महिलांच्या नैसर्गिक प्रसुती, शस्रक्रीया प्रसुती, कुटुंब नियोजन शस्रक्रीया, सर्प दंश, श्वान दंश सह इतर आजारावर उपचार करण्यात येतात. वर्षभरात रुग्णालयात २२ हजार २३१ रुग्णांनी उपचारासाठी आलेले होते. कोविड संकटकाळातही रुग्णालयातील सर्व स्टाफने जीव धोक्यात घालून काम केले आहे. लसिकरण मोहीमही यशस्वीरीत्या केली असुन शहरातील लसिकरण ९५ टक्के पूर्ण करण्यात आले आहे. मी आमदार प्रतिनिधी म्हणून या रुग्णालयात नियुक्त झाल्यपासुन मला अकोले ग्रामीण रुग्णालयाचे कामकाजाच्या बाबत एकही तक्रार अद्याप आलेली नाही. काही त्रुटी असतील त्यात दुरूस्ती करायला हव्यात अश्या सूचनाही खांडगे यांनी केल्या.

यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॅा.मेहेत्रे म्हणाले कि, रुग्णालयाचे अमृतमोहत्सवी वर्षानिमित्त २० एप्रिल रोजी सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन अकोले ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले आहे. त्यात शासनाचे योजना असलेले रुग्णालय व सामाजिक संस्था याचे योगदान घेण्यात येणार आहे. यात एसएमबीटी रुग्णालय व महाविद्यालय, घोटी, मेडीकव्हर रुग्णालाय, संगमनेर, इथापे रुग्णालय, संगमनेर याचाही सहभाग राहणार असून तरी तालुक्यातील जास्तीत रुग्णांनी या शिबिराचा लाभ व्हावा यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत.

कोविड संकटकाळातही अकोले ग्रामीण रुग्णालयात सर्व ड्रॅाक्टरर्स, कर्मचारी यांनी अहोरात्र सेवा दिली आहे. कोविड काळात काम करताना रुग्णलायाचे अनेक कर्मचारी पॅाझिटीव्हही आले. मात्र सेवा बंद ठेवली नाही. कोविड काळात प्रसुती, शस्रक्रीया प्रसुती करताना रात्री अपरात्रीही शस्रक्रीया केल्या तरी कर्मचारी कसलाही कंटाळा व भीती न घेता काम करुन साथ दिली. सर्व कर्मचारी आज अभिनंदनास पात्र आहेत.

प्रास्तविक व सुत्रसंचलन डॅा.संदिप कडलग यांनी केले. यावेळी ५ ठराव करण्यात आले. त्यात अकोले ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय मंजुरी मिळवून दिल्याबद्दल आमदार डॅा.किरण लहामटे यांचे अभिनंदन, उपजिल्हा रुग्णालय मंजुरीस पाठपुरावा करणारे आमदार प्रतिनिधी प्रा.सुरेश खांडगे, अकोले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॅा.संजय घोगरे यांची जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून पदोन्नती अभिनंदन व अकोले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षकपदी डॅा.बाळासाहेब मेहेत्रे याची पदोन्नती बद्दल तसेच कोविड संकटकाळात अकोले ग्रामीण रुग्णालयात काम केलेले सर्व कर्मचाऱ्यांचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल अभिनंदन असे अभिनंदनाचे पाच ठराव करुन सन्मान करण्यात आले.

अकोले ग्रामीण रुग्णालयाचा ३१ मार्च २०२१ ते १ एप्रील २०२२ आलेख —
बाह्य रुग्ण – २३२३१
आंतर रुग्ण – १८८०
प्रसूती – ५६६
सिझरियन प्रसूती -११९
कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया – ८९
मोठ्या शस्त्रक्रिया – १७८
छोट्या शस्त्रक्रिया – २६०
पीयम ( शवविच्छेदन) – ९४
क्ष किरण तपासणी – ५६९
प्रयोग शाळा तपासणी -११५७९
सर्प दंश – ४१
इतर दंश – १६
गरोदर माता तपासणी – ४७७
