कोकणा मधून वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा निर्णय घ्यावा —- आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी
प्रतिनिधी —
कोकणामध्ये वाहून जाणाऱ्या पश्चिम वाहीनी नद्यांचे १०० टीएमसी पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात वळविण्या संदर्भात शासन तातडीने बैठक घेवून कार्यवाही करेल का असा प्रश्न आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत एका लक्षवेधी प्रश्नावरील चर्चेदरम्यान उपस्थित केला.

विखे पाटील यावेळी बोलतांना म्हणाले की, कोकणामध्ये वाहून जाणारे पश्चिम वाहीनी नद्यांचे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात वळविण्याचा मुळ प्रस्ताव होता, या संदर्भात चितळे आयोगा समोर साक्षीही झाल्या, पाणी उचलून कसे आणता येईल, याला विद्युत खर्च किती येईल याबाबतही विचार करण्यात आला होता. आता बोगद्यांव्दारे पाणी आणू शकतो अशीही चर्चा झाली. स्व.गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र पाणी परिषदेने याबाबतचे अहवाल राज्य सरकारला तयार करुन दिले असल्याची बाब त्यांनी जलसंपदा मंत्र्यांच्या निदर्शनास आाणून दिली.

कोकणात जाणारे पश्चिम वाहीनी नद्याचे १०० टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून मराठवाडा, नाशिक आणि खांन्देश हा भाग कायमचा दुष्काळ मुक्त करावा लागेल कारण पाणी उपलब्धतेचे दुसरे साधन नाही, म्हणून पश्चिम वाहीनी नद्यांचे पाणी अग्रक्रमाने गोदावरी खोऱ्यात कसे वळविता येईल याबाबत निर्णय करण्याची अपेक्षा व्यक्त करतानाच अप्पर वैतरणा, लोअर वैतरणा याबाबत भरपुर चर्चा झाली. परंतू पाणीच नसल्याची वस्तुस्थिती त्यांनी या चर्चेदरम्यान विषद केली.

कृष्णा खोऱ्याचे पाणी महाराष्ट्राच्या वाट्याला आणताना मोठ्या प्रमाणात खर्च झाला. मोठमोठया उपसा जलसिंचन योजना तयार करण्यात आल्या, दुष्काळी भागात पाणी जायला लागल्याने या भागातील नागरीक समाधानी झाले. त्यामुळे पुन्हा वाढत्या नागरीकरणामुळे शहर वाढली. त्यामुळे दुष्काळी भागाचे पाणी पुन्हा शहराकडे वळविण्याचा घाट शासनाकडून घातला जात आहे, याला आमचा विरोध नाही परंतू पश्चिम वाहीनी नद्यांचे १०० टिएमसी पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात वळविण्या संदर्भातील प्रस्तावाबद्दल बैठक घेवून शासनाने कार्यवाही करावी अशी मागणी विखे पाटील यांनी करताना मागील भाजप सरकारने हे पश्चिम वाहीनी नद्यांचे पाणी वळविण्याकरीता ५० हजार कोटी रुपयांच्या योजनेला मंत्री मंडळाने तत्वत: मान्यता दिली होती. त्याची अंमलबजावणी शासन करणार का याकडेही आमदार विखे पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

वीजच्या प्रश्नासंदर्भातही आमदार विखे पाटील यांनी सभागृहात आज स्वतंत्र चर्चा घ्यावी अशी मागणी केली. शेतकऱ्यांच्या कृषि पंपाची वीज सातत्याने तोडली जात आहे. वारंवार या सभागृहात या विषयावरुन चर्चा उपस्थित होत आहेत. परंतू सरकार कोणताच ठोस निर्णय घ्यायला तयार नाही. मागील आधिवेशन संपण्यापुर्वी उपमुख्यमंत्र्यांनी कोणत्याही शेतकऱ्यांची वीज आम्ही तोडणार नाही अशी घोषणा केली होती. परंतू आधिवेशन संपताच अधिकाऱ्यांनी सर्रासपणे कनेक्शन कापण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे याबाबत शासनाचे धोरण काय? असा सवाल त्यांनी विचारला.

नाटकी नदी कि गटार असा प्रश्न माझ्या मनात काल उभा राहिला आहे. कालच मी नाटकी नदीच्या पुलावरून फादरवाडी शेजारी असलेल्या माझ्या शेतीची पाहणी करण्यासाठी गेलो होतो. प्रचंड दुर्गंधी सहन करता आली नाही. मला तर शंका येत आहे कि नाटकीचे गटारामध्ये बदल संगमनेर नगरपालिकेने स्वतः होऊन केलेला आहे.
काही दिवसांपूर्वी मीच नाटकी नदीचं पुनर्जीवन आणि पुणरशसन करावे यासाठी काॅमेन्टमध्ये लिहिलंय. प्रवर्तक नदी अकोला संगमनेर जोर्वे व नदी काठाचे लोक पिण्यासाठी वापरत आहेत शतको आणि शतके. प्रचंड प्रमाणात लोकांना मुतखडे कावीळ अशा प्रकारचे रोगराई चा सामना करत आहेत.
बाळासाहेब थोरात व संगमनेर टाईम्सने यासाठी विषयी आवाज उठवला तर नक्कीच नाटकी नदी मुळ स्वरूपात येईल