वाळू माफिया – वाळू तस्कर यांना मदत आणि त्यातून दडपशाही असे मंत्र्यांचे राजकारण —
आमदार राधाकृष्ण विखे पाटील

मंत्री झालात म्हणून दडपशाही करू नका ; वाळू तस्करी, वाळूमाफिया आणि नातेवाईकांना पदे हाच का तुमचा विकास ? खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील
विखे पिता-पुत्रां कडून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता घणाघाती टोलेबाजी

प्रतिनिधी —
जनतेचे प्रश्न सोडविण्या ऐवजी नदीपात्रात प्रदूषित पाणी पाजणाऱ्यांनी विकासाच्या गप्पा शोभत नाहीत. वाळू माफीया, ठेकेदार हाच आपला विकास आहे का? कोविड काळात मुंबईत राहाणे पसंत करणाऱ्यांनी विकासाच्या गप्पा मारू नयेत अशी परखड टिका भाजपाचे जेष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. राष्ट्रीय वयोश्री योजनेतून १५५० जेष्ठांचे जीवन सुखकर केल्याचा मोठा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.

कोल्हेवाडी येथे आयोजित राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या लाभार्थ्याना साधन साहित्य वितरण कार्यक्रमात विखे यांनी प्रदूषित पाण्यावरून टिकेची झोड उठवली. याप्रसंगी खासदार डाॅ.सुजय विखे पाटील, जेष्ठ नेते बापुसाहेब गुळवे, पंचायत समितीचे सदस्य निवृत्ती सांगळे, शांताराम शिंदे भाजपाचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सचिन शिंदे, राहुल दिघे, जोर्वेचे उपसरपंच गोकुळ दिघे,पप्पु गाढे आप्पासाहेब शिंदे, नानासाहेब दिघे, मच्छींद्र भागवत, बाबासाहेब ठोसर, दादासाहेब मेहेत्रे, शिवाजी कोल्हे, गणपत शिंदे आदी उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाले की, देशात चार राज्यात मिळालेले भाजपाचे यश म्हणजे जनतेला दिलेला विश्वास आहे. राज्यातील महाआघाडी म्हणजे महाबिघाडी सरकार आहे. शिर्डी मतदार संघात २६ गावं आल्यानंतर या गावांचा विकास होत आहे. वाळू तस्करी, वाळूमाफीयांना मदत आणि त्यातून दडपशाही असे राजकारण सध्या मंत्र्याकडून होत आहे. कोविड काळात मुंबईल राहून जनतेला वाऱ्यावर सोडले. आपण २५ वर्षात या भागातील जनतेसाठी काय केले? असा सवाल करतांनाच प्रवरा नदी मध्ये संगमनेर मधील सांडपाणी, आपल्या कारखान्याचे दुषित पाणी सोडून ते पाणी जनलेला देता हाच आपला विकास का? असा सवालही विखे यांनी उपस्थित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड काळात जनतेला मोफत धान्य मोफत, लसीकरण त्याचबरोबर विविध योजना सुरु करून जनतेला आधार दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्व नेता ठरले आहेत. श्रीमंत राष्ट्रांना जे जमले नाही ते पंतप्रधान मोदीनी शक्य करून दाखविले असेही विखे पाटील यांनी सांगितले.

खासदार डाॅ. सुजय विखे पाटील म्हणाले की, संख्या कमी आमदारही कमी तरी मंत्री झालात म्हणून दडपशाही करू नका विकासकामे सोडून वाळू माफीया, वाळूतस्करी नातेवाईकांना पदे हाच आपला विकास आहे का? असा सवाल करत मंत्री थोरात यांचे नांव न घेता समाचार घेतला.

५० वर्षात लोकांची प्रश्न सोडून आम्ही राजकारण करत आहोत. तुमच्या दडपशाहीला आणि मंत्री पदाला आम्ही घाबरत नाही तुम्ही ज्या जनतेला वाऱ्यावर सोडले त्यांच्या विकासासाठी आम्ही कायम तत्पर राहू २०२४ मध्ये ही केंद्रात मोदी सरकारच येणार असल्याचे त्यांनी सांगून वयोश्री योजनेच्या माध्यमातून मिळालेले साधन साहीत्य हे टिकाकारांना चपराक असल्याचा टोला खासदार विखे यांनी लगावला.
यावेळी कोल्हेवाडी,जोर्वे,रहिमपुर निंबाळे, मनोली येथील लाभार्थी उपस्थित होते. यावेळी रहीमपूर येथील हनुमान दुध संस्थेचे माजी अध्यक्ष निवृत्ती गजाबा शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
