सावरगाव घुले सोसायटीवर नामदार थोरात गटाचे वर्चस्व !
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले विविध कार्यकारी सेवा सोसायटी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्शल मार्गदर्शनाखाली बळीराजा पॅनलचे निर्विवाद वर्चस्व राहिल आहे.

आज चेअरमनपदी संतोष बन्सी घुले यांची तर व्हाईस चेअरमन पदी रामभाऊ धर्मा घुले यांची बिनविरोध निवड झाली आहे. बळीराजा पॅनलने १२ पैकी १० जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर सर्वानुमते चेअरमन पदासाठी संतोष घुले यांची तर व्हाईस चेअरमन पदासाठी रामभाऊ घुले यांची निवड करण्याचा ठराव पास केला.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नूतन संचालकांचा सत्कार केला. जिल्हा परिषद गटनेते अजय फटांगरे, संगमनेर साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, आमदार डॉक्टर सुधीर तांबे, दुर्गा तांबे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वाघचौरे आणि सचिव बाळासाहेब घुले यांनी काम पाहिले.

दोन्ही पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोध झाल्याने ग्रामस्थानी आभार मानले.आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सेवा सोसायटीच्या माध्यमातून आम्ही सर्व संचालक गावच्या सोसायटीत भरीव योगदान देऊ असे आश्वासन संचालक रामाजी आमले आणि तानाजी घुले यांनी दिले. तर सर्वानुमते बिनविरोध निवड पार पाडल्याबद्दल चेअरमन संतोष घुले यांनी सर्वांचे आभार मानले.

या वेळी या संचालक सुनील घुले, बाबाजी घुले, तानाजी घुले, रमाजी आमले, बिस्मिल्ला शेख, कौसाबाई घुले, अर्जुन घुले, नितीन घुले, संतोष घुले, रामभाऊ घुले, लहानु घुले, माधव खरात, या संचालकांची उपस्थिती होती.

यावेळी लक्ष्मणराव वाघ, गणेश घुले, सचिन घुले, मधुकर घुले, अशोक गायकवाड, राजेंद्र घुले, प्रदीप घुले, उत्तम घुले, भाऊसाहेब घुले, इसाक इनामदार, बापू कोठवळ, सदानंद कोठवळ, शिवाजी घुले, यासह युवक कॉग्रेस कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
