रविवारी संगमनेरात महिला मेळावा !

महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांचा कौतुक सोहळा..

एकविरा फाउंडेशन चा उपक्रम !

प्रतिनिधी —

 

महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या एकविरा फाउंडेशनच्या वतीने कोरोना संकटात सेवाभावी वृत्तीने काम केलेल्या अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका व वैद्यकीय क्षेत्रातील महिला भगिनींच्या कार्यकर्तृत्वाचा कौतुक सोहळा रविवार दिनांक १३ मार्च २०२२ रोजी सकाळी १० वाजता वसंत लॉन्स येथे राज्याच्या महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार प्रणिती शिंदे, आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला असल्याची माहिती एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. थोरात म्हणाल्या की, एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून मागील तीन वर्षात महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले आहेत. कोरोनाच्या महासंकटात अत्यंत धीरोदत्तपणे काम करणार्‍या आरोग्य विभागातील महिला भगिनी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांचे काम अत्यंत कौतुकास्पद राहिले आहे. या कार्यकर्तृत्वाचा सन्मान व्हावा यासाठी एकविरा फाउंडेशन च्या वतीने या सर्व महिलांचा कौतुक सोहळा होणार आहे.

यावेळी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा व युवा आमदार प्रणिती शिंदे, आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, कांचनताई थोरात, शरयु देशमुख, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती मीरा शेटे, तालुक्याच्या सभापती सुनंदा जोर्वेकर यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्या व विविध संस्थांच्या महिला पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

याप्रसंगी तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका, आशा सेविका,आरोग्य सेविका यांना सन्मानपत्र, हेल्थकार्ड व आरोग्य किटचे वाटप करण्यात येणार आहे.

तरी या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन एकविरा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!