अकोले तालुक्यातील २२ महिलांना ‘स्री शक्ती सन्मान !

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा उपक्रम…
प्रतिनिधी —
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील बावीस महिलांचा “स्त्री शक्ती सन्मान” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
अकोले येथील पत्रकार संघाच्या कार्यालयात पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या हस्ते महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे हे होते. यावेळी माजी जिप सदस्य बाजीराव दराडे, पत्रकार संघाचे जिल्हाअध्यक्ष अनिल रहाणे, जिल्हा उपाध्यक्ष विध्याचंद्र सातपुते, प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे, अमोल वैद्य, हेमंत आवारी, संदिप दातखिळे हे उपस्थित होते.

पुरस्कार मिळालेल्या महिला पुढील प्रमाणे :-
अकोलेच्या नगराध्यक्षा सोनाली चेतन नाईकवाडी यांना राजकीय क्षेत्रातील कार्याबद्दल तर अकोले नगरसेविका शितल अमोल वैद्य व प्रतिभाताई भास्कर घुले ( शिक्षण ), कोरोना काळातील योगदान बद्दल अर्चना अजित नवले, दिपाली सचिन नवले ( वैद्यकीय ), ॲड. मंगल किसन हांडे ( न्याय ), प्रगती रावसाहेब वाकचौरे( सरपंच), मनीषा रामनाथ ढगे ( महसूल ), हौसाबाई दातीर (ग्रामसेवक ), शुभांगी बोऱ्हाडे शेलार ( दूरसंचार निगम ), सुवर्णा मुंदडा ( बँक ), वैशाली राजू महाले (बचतगट), विमल वाळेकर ( पोलीस ), सुनीता संपत फटांगरे ( कृषी सहाय्यक ), संगीता बाळासाहेब नाईकवाडी, ( सामाजिक), अनिता योगेश फापळे, ( पतसंस्था), संगीता अशोक पवार ( सफाई कामगार), निशा संदिप मोरे, मीना सुरेश शिंदे, कल्पना हरिभाऊ फापळे ( व्यवसाय), विद्या सुरेश कोल्हाळ ( आशा वर्कर ), सुनीता बाळासाहेब मांडे ( अंगणवाडी सेविका ) यांना सन्मान पत्र, स्मृती चिन्ह, चांदीची लक्ष्मी, शाल, पैठणी, बुके देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे नियोजन तालुकाध्यक्ष अशोक उगले, उपाध्यक्ष हरिभाऊ फापाळे, ललीत मुतडक, गणेश रेवगडे निखिल भांगरे, ओंकार अस्वले, सुरेश देशमुख यांनी केले होते.
