सुस्तावलेला बिबट्या वनविभागाच्या ताब्यात !

प्रतिनिधी —

चपळ हालचालीने आपली शिकार पकडण्यात तरबेज असलेला बिबट्या एखाद्या शेतात सुस्तावून निवांतपणे झाडी झुडुपां मध्ये बसलेल्या पाहिल्यावर आपल्याला काय वाटेल..

अगदी अशीच घटना संगमनेर तालुक्यात घडलेली आहे. तालुक्यातील पठार भागात एका शेतात छोट्याशा झाडे झुडपात अक्षरश: सुस्तावलेला बिबट्या बसलेला पाहून नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

शेवटी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना अनेक कर्मचाऱ्यांना पाचारण करून त्याला इंजेक्शनद्वारे बेशुद्ध करीत ताब्यात घेण्यात आले.

संगमनेर तालुक्यातील रणखांब येथे एका शेतात बिबट्या बराच वेळ सुस्तावलेल्या अवस्थेत बसून राहिल्याने  नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

बिबट्या जरी सुस्तावून बसलेला होता तरी नागरिकांच्या काळजाचा ठोका मात्र चुकलेला होता त्याच्याजवळ जाण्याची कोणाचीही हिंमत नव्हती त्याची भीती आणि दहशत एवढी त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्याला व्यवस्थित पिंजऱ्यात अडकल्यानंतर जमलेल्या नागरिकांना हायसे वाटले.

याबाबत माहिती अशी की,   रणखांब गावापासून काही अंतरावर एका शेतात बिबट्याला बसलेल्या अवस्थेत काही जणांनी पाहिले. त्यामुळे त्यांची चांगलीच धादंल उडाली होती. मात्र बिबट्याची काही हालचाल दिसत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तोपर्यंत ही वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरली. आणि बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांनी एकच गर्दी केली होती.

बराच वेळ झाला तरी बिबट्याची हालचाल दिसत नसल्याने अनेकांच्या मनात आश्चर्य आणि शंका होत्या. पण त्याच्या जवळ जाणे शक्य नव्हते. त्यामुळे अखेर नागरिकांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली.

त्यानंतर उपविभागीय वनधिकारी संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनेनुसार भाग तीनचे वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीमचे एस.एम.पारधी, वनपाल सुहास उपासनी, वनरक्षक श्री जोजार, एस.पी.वर्पै, रामभाऊ वर्पै, रविंद्र पडवळे, बाळासाहेब फटांगरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि नागरिकांना बाजूला केले.

मग पिंजराही आनण्यात आला आणि रेस्क्यू ऑपरेशन करून आल्हादपने बिबट्यास बेशुध्द केले. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने त्याला पिंजर्‍यात जेरबंद करत त्यास चंदनापुरी घाटातील निसर्ग परिचय केंद्रात नेण्यात आले. दरम्यान बिबट्यास जेरबंद करून नेल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!