ओबीसी समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणूका घेवू नयेत —

आमदार राधाकृष्ण विखे पाटील

 प्रतिनिधी –

ओबीसी आरक्षणच्‍या संदर्भात महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षे वाया घालविली. आघाडी सरकारच्‍या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजाला आपले राजकीय आरक्षण गमवावे लागले असल्‍याचा आरोप आमदार राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केला. ओबीसी समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणूका घेवू नयेत अशी मागणी त्‍यांनी केली.

राज्‍यातील आघाडी सरकारने ओबीसी समाजाच्‍या राजकीय आरक्षणाबाबत कोणतीही पाऊलं गांभिर्याने टाकली नाहीत. मार्च २०२१ मध्‍ये सर्वोच्‍च न्‍यायालयाने हे आरक्षण रद्द करणारा निकाल दिल्‍यानंतरही हे सरकार जागे झाले नाही. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या सुचनेनुसार इम्पिरीकल डेटा गोळा झाला असता तर, या समाजाला राजकीय आरक्षण स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थामध्‍ये परत मिळाले असते.

मात्र या सरकारने मागासवर्गीय आयोग नेमण्‍याचीही तसदी घेतली नाही त्‍यामुळे डेटा गोळा करण्‍याचे काम होवू शकले नाही याकडे लक्ष वेधून विखे पाटील म्‍हणाले की, आघाडी सरकारमधील मंत्री केंद्राकडे बोट दाखवून डेटा देण्‍याची मागणी करीत होते परंतू असा राजकीय डेटा गोळा करण्‍याची जबाबदारी केंद्राची नाही तर राज्‍याची होती याचा सोईस्‍कर विसर आघाडीच्‍या नेत्‍यांना पडला. त्‍यामुळे राज्‍य सरकारचे केवळ वेळाकाढू धोरण सर्वोच्‍च न्‍यायालयात गुरुवारी उघडे पडल्‍याची टिका विखे पाटील यांनी केली.

मागासवर्गीय आयोगाला पुरेसा निधीही आघाडी सरकार उपलब्‍ध करुन देवू शकले नाही.न्यायालयात सादर केलेल्या अहवालातही त्रृटी निघाल्या त्यामुळेच न्‍यायालयाने चपराक दिल्‍यानंतर घाईघाईमध्‍ये काल ३४ कंत्राटी कामगार देण्‍याचा अध्‍यादेश काढला. यावरुनच ओबीसी समाजाला आरक्षण मिळू नये हीच भूमिका आघाडी सरकारची असल्‍याचे आता स्‍प्‍ष्‍ट झाले आहे. ओबीसी समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणूका घेवू नयेत अशी मागणी आमदार राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली आहे.

RRAJA VARAT

One thought on “ओबीसी समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणूका घेवू नयेत — आमदार राधाकृष्ण विखे पाटील”
  1. शेवटचं सेन्सस झाले त्या वेळी एम्पिरिकल डाटा जातीनिहाय केला होता तोही घरोघरी जाऊन व पुरावे गोळा केले होते. दुर्दैवाने भारतातील सरकार सत्तेवर आल्यावर आताच्या सरकारने ती गोळा केलेली माहिती प्रत्येक राज्य सरकारला द्यायला पाहीजे पण तसे होताना दिसत नाही. फक्त छगन भुजबळ व कै.मुंढे यांनी प्रयत्न केले होते.
    सर्व माहिती गोळा करताना सर्व नागरिकांना एक कार्बन काॅपीची प्रत दिली आहे. माझ्या कुटुंबातल्या बायको मुलगा व सुन व मुलगी यांची नावे असलेली प्रत मी जपून ठेवलेली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!