पानोडी सोसायटीवर थोरात गटाचे निर्विवाद वर्चस्व

प्रतिनिधी —
१९२६ साली स्थापन झालेल्या सहकार क्षेत्रातील सर्वात जुन्या अशा संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदार संघातील पानोडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचा पंचवार्षिक निवडणूकीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात याच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळाने बिनविरोध जागेसह १३ जागेवर दणदणीत विजय मिळवून आपले वर्चस्व राखल्याने सामाजिक, सहकार, राजकिय व सर्व सामान्याकरिता योगदान देणाऱ्या स्व.शिवाजीराव थोरात यांना खऱ्या अर्थाने विजयांची श्रद्धाजंली ठरली आहे.

स्वातंत्र्य पूर्व काळात म्हणजे १९२६ साली या सेवा सहकारी सोसायटी स्थापना करण्यात आली होती. गेल्या अनेक वर्षापासून संस्थेची ४ ते ५ निवडणुका अटीतटीने झाल्याचे चित्र दिसले आहे. मात्र या संस्थेवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व शेतकी संघाचे चेअरमन शिवाजीराव थोरात याच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्याचे वर्चस्व राहिले. स्व. शिवाजीराव थोरात यांनी विकासात्मक कामाच्या माध्यमातून विश्वास संपादन करत माणसे जोडण्याचे निस्वार्थी पणे काम केल्यानेचं सत्ता कायम ठेवण्यासाठी मोठे यश आले. या करिता संगमनेर दूध संघ संचालक विक्रम थोरात, माजी उपसंरपच विनायक थोरात, संरपच गणपत हजारे , सोसायटी चेअरमन बबनराव कराड, माणिक पाबळ, शरद जाधव, सूर्यभान थोरात, आबासाहेब जाधव , बाळासाहेब तळेकर, दिनकर कदम आदिसह कार्यकर्त्याची विजयासाठी परिश्रम घेतले.

पानोडी सोसायटीच्या निवडणुकीत ५५६ सभासदां पैकी ५११ सभासदांनी मतदान केले. थोरात गटाच्या शेतकरी विकास मंडळाच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला.
विजयी उमेदवार पुढील प्रमाणे सर्व साधारण – बबन पांडूरंग कराड ( २८८ ), विनायक शिवाजीराव थोरात (३१६), कारभारी गंगाधर जाधव (३००), विठोबा शंकर जाधव (३०१), मधुकर सखाराम ढोणे (२९१), भाऊसाहेब तुकाराम तळेकर (२९७), रावसाहेब सबाजी हजारे (२९०), कारभारी भागा साबळे (२९७ ), अनु जाती / जमाती – भाऊसाहेब यादव मुन्तोडे (२९२), महीला राखीव – नवसाबाई शाताराम खैरे (२९०), पुष्पा महादू पाबळ ( २९३ ) वि.जा / म.भ / वि मा. प्रवर्ग – नामदेव किसन सानप ( ३१४ ) तर इतर मा. प्रवर्ग – आप्पासाहेब नामदेव खेडकर (बिनविरोध ) असून निवडणुक आधिकारी ए. एस. शेख तर सहाय्यक प्रविण आढाव, प्रकाश कडलग, मोहन पवार, मुकुंद सातपूते, राजेश जोशी, भाऊसाहेब तांबे, विलास जोधळे, भिमराज वर्पे, कृष्णा बस्ते, बाबासाहेब वर्पे, बाबासाहेब भवर, चतुरे यानी काम पाहीले.

या सर्व विजयी उमेदवारांचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव पा खेमनर, माधवराव कानवडे, दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, सत्यजित तांबे, रणजितसिंह देशमुख, बाबा ओहोळ, गणपत सांगळे, विजय हिंगे, विनायक थोरात,राजेंद्र चकोर आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
गेल्या अनेक वर्ष स्व. शिवाजीराव थोरात यांनी नि स्वार्थी व प्रामाणिकपणे लोकाची विकासात्मक कामे केली. हा सोसायटीचा विजय त्याचेचं प्रतिक असून भविष्यात कार्यकर्त्याला बळ देवून सहकारी संस्था मजबूत करुन लोकांना विकासाच्या प्रवाहात आणणार – विनायक थोरात

