निमज सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत शेतकरी विकास मंडळाचा दणदणीत विजय
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या निमज विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शेतकी संघाचे व्हा.चेअरमन संपतराव डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास मंडळाने सर्व जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे.

निमज हे गाव आदर्श गाव म्हणून ओळखले जाते. गेली अनेक वर्षे या गावाची बिनविरोध निवडणुकीची परंपरा आहे. मात्र या वेळेस सेवा सोसायटी मध्ये निवडणूक झाल्याने शेतकरी विकास मंडळाने मोठ्या मताधिक्याने सर्व जागांवर विजय मिळवला आहे.

यामध्ये सर्वसाधारण गटातून कासार भाऊसाहेब तुकाराम, गुंजाळ तुकाराम काशिनाथ, गुंजाळ शांताराम आप्पाजी, डोंगरे तूळशिराम नामदेव, डोंगरे पाराजी तुकाराम, बिबवे भाऊसाहेब गबाजी, भोकनळ मच्छिंद्र बादशहा, शेटे पुंजा भिका हे विजयी झाले आहेत. तर महिला राखीव मधून कासार कमलाबाई गोपिनाथ, डोंगरे मंगल दत्तात्रेय इतर मागासवर्गीय मधून शिंदे सोमनाथ गोपीनाथ, भटक्या विमुक्त जाती जमाती मधून मतकर बाबाराजे अण्णासाहेब ही विजयी झाले आहेत. अनुसूचित जमाती मधून आडांगळे सचिन गौतम हे विजयी झाले आहेत.

शेतकरी विकास मंडळाचे उमेदवार विजयी होण्यासाठी शेतकी संघाचे व्हाईस चेअरमन संपतराव डोंगरे, माजी उपसरपंच विलास कासार, अरुण गुंजाळ, मंगेश मतकर, रामनाथ डोंगरे, गंगाधर डोंगरे, विजय गुंजाळ, सागर डोंगरे ,विवेक कासार ,जिजाबाई शिंदे, संतोष डोंगरे ,अविनाश बिडवे, कैलास शिंदे ,संतोष कासार, नवनाथ डोंगरे, संदीप गुंजाळ ,युवराज डोंगरे, बाळासाहेब कासार, विष्णू डोंगरे, आबा साहेब डोंगरे, शरद डोंगरे, शिवाजी गुंजाळ यांसह सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.

या नवीन संचालक मंडळाचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, दुर्गाताई तांबे, माधवराव कानवडे, इंद्रजीत थोरात, रणजीतसिंह देशमुख, सत्यजीत तांबे, बाबा ओहोळ, रामहरी कातोरे, पांडुरंग घुले आदींसह विविध पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
