अमृतवाहिनी आयटीआयच्या 6 विद्यार्थ्यांची दुबईमधील कंपनीत निवड

संगमनेर | प्रतिनिधी

माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तेतून राज्यात अग्रगण्य ठरलेल्या अमृतवाहिनी आयटीआय मधील 6 विद्यार्थ्यांची दुबई येथील कंपनीत चांगल्या पगारावर निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य विलास भाटे यांनी दिली आहे.

दुबई येथील जी बी एम टी स्टील सर्विसेस या कंपनीचा कॅम्पस इंटरव्यू अमृतवाहिनी आयटीआय मध्ये पार पडला यावेळी कंपनीचे जनरल मॅनेजर सतीश खुळे व प्रोडक्शन हेड प्रमोद आवारी उपस्थित होते यावेळी त्यांनी इलेक्ट्रिशियन व फिटर ट्रेड च्या विद्यार्थ्यांची इंटरव्यू घेतली यामधून सहा विद्यार्थ्यांची मोठ्या पॅकेजवर निवड झाली आहे. कॅम्पस इंटरव्यू मुळे अनेक विद्यार्थ्यांना नोकरीच्या सध्या उपलब्ध होत असून देशाबाहेर अमृतवाहिनीतील संस्थेने आपल्या यशाचा झेंडा फडकवला आहे.

इलेक्ट्रिशनच्या या यशाबद्दल मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, कार्यकारी विश्वस्त सौ शरयू ताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे ,मॅनेजर प्रा. विवेक धुमाळ, अकॅडमी डायरेक्टर डॉ जे बी गुरव ,प्राचार्य विलास भाटे ,नामदेव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!