कोकणगाव येथे अद्यावत अभ्यासिका होणार — डॉ. जयश्री थोरात
संगमनेर प्रतिनिध —
संगमनेर तालुक्यातील तरुणांना अभ्यास करण्याकरता नऊ अद्यावत अभ्यासिका बांधण्यात येणार आहे. या अंतर्गत कोकणगाव येथे विद्यार्थी व विद्यार्थिनी करता अभ्यासिका होणार असल्याने स्थानिक विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार असल्याचे प्रतिपादन युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी केले आहे.

कोकणगाव येथे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या निधीतून ग्रामविकास कार्यक्रम 2515 अंतर्गत अभ्यासिकेची भूमिपूजन करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या याप्रसंगी शिवाजी जोंधळे, सरपंच आशा जोंधळे, लक्ष्मण जोंधळे, हनुमंत जोंधळे, दिलीप जोंधळे, सुखदेव जोंधळे, भीमाशंकर जोंधळे, विठ्ठल पानसरे, शिवाजी वामन, जालिंदर जोंधळे, सुभाष ढगे, भाऊसाहेब पानसरे, भाऊसाहेब जोंधळे, मुख्याध्यापक राहणे मॅडम, आदित्य पवार, दीपक जोंधळे, योगेश जोंधळे, महेश जोंधळे, संदीप जोंधळे, विकी पारधी, चंद्रकांत वायकर तसेच निझर्णेश्वर विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ.थोरात म्हणाल्या की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका हा आपला परिवार मानला. सतत 40 वर्ष अविरत काम केले एकही दिवस कधी त्यांनी सुट्टी घेतली नाही त्यामुळे निळवंडे धरण कालवे अशी मोठमोठी ऐतिहासिक कामे मार्गी लागले. प्रत्येक गावात विकासाच्या योजना मार्गी लावल्या. सहकार, शेती, ग्रामीण विकास दूध व्यवसाय यामधून तालुका विकसित केला.
आज राज्यामध्ये संगमनेर तालुक्याचा लौकिक आहे. सहकार शेती बरोबर शिक्षणातून समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा याकरता संगमनेर हे शिक्षणाचे प्रगत केंद्र होण्यासाठी त्यांनी काम केले आहे याचबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावातच चांगल्या सुविधा मिळाव्या याकरता नऊ अभ्यासिका मंजूर केल्या आहेत.

राज्य पातळीवर ही अभिनव संकल्पना असून कोकणगाव मध्ये होत असलेल्या अद्यावत अभ्यासिकेमुळे विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार असून वाचन चळवळ वाढण्यास मदत होणार आहे. वाचाल तर वाचाल ही संकल्पना खरी आहे. युवकांनी मोबाईलचा स्क्रीन टाईम कमी केला पाहिजे याचबरोबर पालकांनी विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवले पाहिजे असे त्या म्हणाल्या.

तर सरपंच आशा जोंधळे म्हणाल्या की, ज्या लोकांनी एक वर्षात काही केले नाही ते म्हणत आहेत चाळीस वर्षात काय केलं, तुम्ही ज्या रस्त्यावर उभे आहात, ज्या स्टैंड वर मागील एक वर्ष फ्लेक्स लावले ते लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यांनी उभे केले आहे. मागील एक वर्षात संगमनेरच्या नवीन लोकप्रतिनिधीने संगमनेर तालुका हा बाहेरच्या लोकांच्या हातात दिला असल्याची टीका त्यांनी केली. मंत्री येतात आणि एमआयडीसी मंजूर नदी मंजूर पाणी मंजूर डोंगर मंजूर असे काहीही सांगून जातात हे आपण पाहिले आहे. भूलथापा देणाऱ्या या लोकांकडे युवक कधीही लक्ष देणार नाही असे त्या म्हणाल्या.
