महानगरपालिका निवडणूक  —

पोलिसांनी संशयास्पद गाड्यांची केली कसून तपासणी… पण काहीच सापडले नाही !

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीचा धडाका सुरू झाला आहे. ज्या ज्या महानगरपालिकांची निवडणूक आहे तेथील पोलीस अलर्ट मोडवर आहेत. आचार संहिता आणि सर्वच अवैध प्रकारांवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे. याचाच भाग याचाच एक भाग म्हणून अहिल्यानगर पोलिसांनी आज अचानक नाकेबंदी करून वाहनांवर कारवाई केली तर 139 संशयास्पद वाहने कसून तपासली मात्र पोलिसांना या वाहनात काहीच सापडले नाही.

महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नाकाबंदी करून वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरुध्द विशेष कारवाई अहिल्यानगर पोलिसांकडून करण्यात आली. बाबासाहेब बोरसे, पोलीस निरीक्षक, शहर वाहतुक नियंत्रण शाखा, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिनस्त पोलीस अधिकारी पोसई आण्णासाहेब परदेशी, ग्रेड पोउनि मन्सुर सय्यद, सफौ. रामराव शिरसाट, सफौ. गणेश आरणे, सफौ. संजय घोरपडे, मपोशि. जयश्री सुद्रीक यांनी आज शहरात प्रोफेसर चौक व भिस्तबाग चौक येथे अचानक नाकाबंदी करुन १३९ संशयास्पद वाहने कसून तपासली मात्र त्यात काही आढळून आले नाही.

मात्र वाहतूक भंग करणाऱ्या वाहन चालुकांविरुद्ध कारवाई करण्यात आली त्यामध्ये ३, मोबाईल टॉकींग, ०४ विना सिट बेल्ट – १०, काळी काच रहदारीस अडथळा १७, विना लायसन्स ०९, तसेच विना नंबर प्लेट १६, ड्रंक अँड ड्राईव्ह ०२ व मोटार वाहन १७ केसेस करण्यात आलेल्या असुन ३५००/- रु दंड रोख वसुल करण्यात आलेला आहे.एकुण केसेस ६८ केसेस व अनपेड दंड ५८,०००/- रु अशी कारवाई करण्यात आलेली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!