निळवंडे कालव्यातून उपसा सिंचन योजना द्वारे पाणी देणार — जलसंपदा मंत्री विखे पाटील

चंदनापुरी, सावरगावतळ, झोळे, हिवरगाव पावसा शिरापूर गावांना होणार लाभ

संगमनेर प्रतिनिधी —

शाश्वत पाण्यापासून वंचित असलेल्या चंदनापुरी, सावरगावतळ, झोळे, हिवरगाव पावसा व शिरापूर या गावांना निळवंडे कळव्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी निळवंडे कालव्यावरून उपसा सिंचन योजना राबविण्यास जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तत्त्वतः मान्यता दिली असल्याची माहिती आमदार खताळ यांच्या प्रसिद्धी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

आमदार अमोल खताळ यांच्या सोबत चंदनापुरीचे माजी सरपंच प्रमोद रहाणे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ रहाणे ग्रा.प. सदस्य श्याम रहाणे सावरगावतळचे शरद नेहे यांनी आज पालकमंत्र्यांची भेट घेऊन चंदनापुरी, सावरगावतळ, झोळे, हिवरगाव पावसा शिरापूर गावांना निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यावरून पाणी देण्यात यावे अशी मागणी केली. उपसा सिंचन योजनेचा सर्वेक्षण पूर्ण झाले असून पुढील कार्यवाही प्रलंबित असल्याची बाब तसेच योजनेची नितांत गरज त्यांच्या निदर्शनास आणून दिली.

या वेळी जलसंपदा विभाग अधिकाऱ्यां कडून वस्तुस्थितीची माहिती घेतली असता कार्यकारी अभियंता कवडे व माने यांनी योजनेचे प्रारूप सर्वेक्षण व अंदाज पत्रक तयार असल्याची माहिती दिली. त्यानुसार मंत्री विखे पाटील यांनी या योजनेस तात्काळ मान्यता देत प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव नियामक मंडळासमोर सादर करण्याचे आदेश दिले.

या योजनेस सुमारे २५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या आदेशामुळे मंजुरीचा मार्ग मोकळा झाला आहे. या सर्वांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे व आग्रही भूमिकेमुळे योजनेला तत्त्वतः मान्यता मिळाल्यामुळे परिसरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. वरील सर्व गावातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांचे आभार मानले आहेत. यावेळी भाजप माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, भाजप सरचिटणीस गणेश दवंगे, हिवरगाव पावसा सरपंच सुभाष गडाख, उपसरपंच सुजाता दवंगे, झोळे उपसरपंच गोविंद खर्डे, चंदनापुरी ग्रामपंचायत सदस्य अंकुश रहाणे, किसन सरोदे, नितीन रहाणे, केशव दवंगे आदी उपस्थित होते.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!