संगमनेर नगरपालिकेच्या कचऱ्याने रायतेवाडी ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात ! 

प्राण्यांच्या मांसाचे तुकडे, जनावरांचे अवशेष कचऱ्यातून टाकण्यात येतात..

रास्ता रोको, आमरण उपोषण आंदोलनाचा इशारा…

 

प्रतिनिधी —

 

संगमनेर नगरपालिकेच्या कचऱ्यातून प्राण्यांच्या मांसाचे तुकडे, जनावरांचे अवशेष टाकण्यात येत असल्याने रायतेवाडी शिवारातील शेतकर्‍यांचे नुकसान होत असून त्या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. तसेच ओढा आणि विहिरीचे पाणी दूषित झाले असल्याने रोगराई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात नगरपालिकेला संबंधित नागरिक आणि शेतकरी तसेच ग्रामपंचायतीने तक्रार केलेली असून देखील अद्याप पर्यंत कुठलीही कारवाई झालेली दिसत नाही.

संपूर्ण संगमनेर शहरात होणारा कचरा गोळा करून तो रायतेवाडी शहरालगत एका कचरा डेपोमध्ये टाकण्यात येतो. या कचरा डेपो लगत असणाऱ्या ढोमसे यांच्या शेतीवर कचऱ्यामुळे परिणाम होऊ लागला आहे. तसेच आजूबाजूच्या विहिरी आणि पाण्यावर देखील या कचऱ्याचा परिणाम होऊन दूषित पणा वाढला असल्याचे तेथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

संगमनेर शहरातील सर्व प्रकारच्या ओल्या सुक्या कचऱ्या जनावराच्या माणसांचे तुकडे आणि जनावरांचे अवशेष सुद्धा टाकले जात असल्याने त्याठिकाणी अतिशय दुर्गंधी पसरलेली आहे. या सर्व बाबींची तक्रार संगमनेर नगरपरिषदे कडे करण्यात आलेली आहे.

शिवारातील रहिवासी रवींद्र ढोमसे आणि साईराम धोमसे यांच्या शेताच्या अगदी कडेलाच रायतेवाडी गावच्या शिवारा लगत हा कचरा टाकण्यात येतो. तसेच रायतेवाडी ओढ्यात व केटीवेअर मध्ये रात्रीच्या वेळी देखील हा कचरा टाकला जात आहे. ओढ्याचे पाणी दूषित झाले असून रायतेवाडी गावात सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे गावात साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या मुळे गावात डासांचा उपद्रव फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे साथीचे आजार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगरपालिकेच्या या कचऱ्यामुळे आरोग्य विषयक समस्या निर्माण झाल्यास नगरपालिकेची जबाबदार राहील असे ग्रामपंचायतीच्या वतीने नगरपालिकेला पत्र देण्यात आलेले आहे. सहा महिन्यापूर्वी हे पत्र दिले असून अद्याप पर्यंत त्यावर कुठलीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही.

शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संबंधित ठेकेदाराला अनेक वेळा तक्रार करूनही आणि सांगूनही शेताच्या लगत आणि ओढा आणि केटीवेअर मध्ये कचरा टाकण्यात येतो. त्यामुळे या कचऱ्यातील प्लास्टिक आणि इतर हलक्या वस्तू , कचरा वाऱ्याने उडून येऊन शेतात जाऊन पडते. त्याचा परिणाम शेतावर आणि पिकांवर होतो. वेळोवेळी तक्रार करूनही संबंधित ठेकेदार आणि नगरपालिका याकडे कुठलेही लक्ष देत नाही. यामुळे काही जीवित हानी झाली तर त्यास नगरपालिका आणि संबंधित ठेकेदार जबाबदार राहतील.

यावर लवकरात लवकर कार्यवाही झाली नाही तर रस्ता रोको किंवा आमरण उपोषण असे आंदोलन मार्ग अवलंबावे लागतील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

ग्रामस्थांनी त्यांच्या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी अहमदनगर, प्रांताधिकारी संगमनेर, तहसीलदार संगमनेर, गटविकास अधिकारी संगमनेर आणि वैद्यकीय अधिकारी धांदरफळ यांना दिल्या आहेत.

या निवेदनावर नरेंद्र महादेव शिंदे, सागर अण्णासाहेब शिंदे, बाबुराव धोंडीबा मंडलिक, चैतन्य सुभाष मंडलिक, संतोष बाळासाहेब शिंदे, संजय मंडलिक, सतीश दत्तात्रय मंडलिक, गौरव बाबुराव मंडलिक आदीची नावे व सह्या आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!