धार्मिकतेच्या नावावर संगमनेरचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न – माजीमंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेरची सुसंस्कृत राजकीय परंपरा टिकली पाहिजे.

निवडणुका आल्या की मोर्चे काढून वातावरण खराब करण्याचा डाव

संगमनेर प्रतिनिधी दिनांक 17  

घुलेवाडी येथील सप्ताहात जे घडले ते तालुक्यातील जनतेने समजून घेतले पाहिजे. संगमनेर तालुका शांतता आणि बंधुतेचे वातावरण असणारा सुजलाम सुफलाम तालुका आहे. मात्र धर्माच्या व्यासपीठावरून आणि धर्माच्या नावावर काही लोक राजकारण करत असून संगमनेर तालुक्यातील वातावरण खराब करत असल्याचा आरोप माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. याचबरोबर अशा अशांतता निर्माण करणाऱ्या शक्तींना वेळीच रोखून संगमनेर तालुक्याची सुसंस्कृत राजकीय परंपरा टिकवण्याची तालुक्यातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

घुलेवाडी येथील सप्ताहात धर्माच्या आडून वाद निर्माण करण्यासाठी काही जातीयवादी शक्तीकडून नियोजन करून घडवण्यात आलेल्या प्रसंगाबाबत बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, संगमनेर तालुका हा शांततेचे बंधूभावाचे वातावरण असणारा तालुका आहे. विकासाची सातत्याने वाटचाल करणारा हा तालुका आहे. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये वारकरी संप्रदायाचे विचार मांडण्यासाठीचे ते व्यासपीठ आहे. आपल्या संतांचे विचार त्या व्यासपीठावरून मांडले गेले पाहिजे. त्या व्यासपीठाला काही मर्यादा आहेत. काही नियम आहेत. ते सर्वांनी पाळले पाहिजे. हे पथ्य किंवा नियम असे आहे की, या व्यासपीठावरून राजकारण होता कामा नये. कारण या ठिकाणी सर्व लोक एकत्र येतात बंधू भावाचे वातावरण त्या ठिकाणी असते.

मात्र घुलेवाडी येथे तथाकथित महाराजांनी त्या व्यासपीठावरून राजकारण सुरू केले. राजकीय भाषण सुरू केले. याला नागरिक शांततेच्या मार्गाने विरोध करत होते. हे लक्षात घेतले पाहिजे. त्यानंतर होणाऱ्या केसेस त्यांच्यावर लावली जाणारी खोटी कलमे, त्यातून छळ करण्याचा प्रयत्न चालला आहे. संगमनेर तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न चालला आहे. माणसा माणसांमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न चालला आहे. आपल्या तालुक्याची शांतता बिघडून टाकण्याचे काम सध्या सुरू आहे.

जो तालुका सुजलाम सुफलाम आणि शांततेची वाटचाल करणारा तालुका आहे. ज्या तालुक्याचा राज्य पातळीवर गौरव होतो. त्या तालुक्याचा विकास कसा मोडता येईल याचा प्रयत्न काही शक्ती करत आहेत आणि याचा तो भाग आहे. मागे विधानसभेच्या अगोदर एक मोर्चा काढण्यात आला निवडणूक आली की मोर्चा काढायचा, वाईट साईट भाषणे करायची आणि वातावरण खराब करायचे असा प्रयत्न काही लोकांचा आहे. आता पुन्हा निवडणुका आल्या आहेत म्हणून काही समजून न घेता मोर्चा काढून वातावरण बिघडवण्याचे काम काही शक्तींचा असून त्यांना तालुक्याचा विकास थांबवायचा आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!