संगमनेर व्यापार आघाडी सेलच्या अध्यक्ष पदी शिवकुमार भंगिरे यांची निवड !
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 9 –
भारतीय जनता पार्टी संगमनेर शहर मंडल व्यापारी आघाडी सेल अध्यक्ष पदी जेष्ठ कार्यकर्ते शिवकुमार भंगिरे यांची निवड करण्यात आली आहे. तसे नियुक्ती पत्रक माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रदान केले आहे. शहराध्यक्षा पायल आशीष ताजणे यांनी नुकतीच कार्यकारिणी जाहीर केली आहे, यात त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

शहराध्यक्षा पायल ताजणे यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रकात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी शिवकुमार भंगिरे यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

भंगिरे यांनी संगमनेर शहरात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून, संघटनात्मक बांधणीसाठी त्यांचा अनुभव उपयुक्त ठरेल, असेही सौ. ताजणे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
शिवकुमार भंगिरे यांचा संगमनेर शहरात मोठा जनसंपर्क आहे, पक्षसंघटनेत विविध पद भुषविले आहे, या सर्व बाबींचा मोठा अनुभव असल्याने पक्षसंघटनेला व येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मदत होईल असे मत पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देताना व्यक्त केले आहे.
