विज पुरवठ्यामध्ये तात्काळ सुधारणा करून नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी —
संगमनेर संभाजी ब्रिगेडची मागणी
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 23
संगमनेर शहर आणि तालुक्यात सातत्याने खंडित होणारा वीज पुरवठा, सातत्याने होल्टेज कमी जास्त होणे, लाईटचे झटके सुरू राहणे आधी प्रकारांमुळे गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ यात सुधारणा करण्यात यावी आणि कायद्याप्रमाणे नागरिकांना वीज वितरण विभागाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड संगमनेर यांच्या वतीने करण्यात आली आहे. तशा आशयाचे निवेदन वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, आम्ही संगमनेर येथील सर्व नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे हे निवेदन सादर करत आहोत. गेल्या काही महिन्यांपासून आमच्या परिसरात वारंवार वीजपुरवठ्यात फेज गेलेली, कमी व्होल्टेज किंवा जास्त होल्टेज यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण, वृद्धांचे आरोग्य, व्यापाऱ्यांचे व्यवहार आणि सर्वसामान्यांचे जीवनमान यावर तीव्र परिणाम झाला आहे.

विजेच्या असमर्थ पुरवठ्यामुळे झालेला त्रास पुढील प्रमाणे आहेः दिवे आणि पंखे चालत नाहीत, पंप चालत नाहीत पाणीटंचाई, फ्रीज, टीव्ही, कंप्यूटर, मोबाईल चार्जर वापरणे अशक्य, व्यापाऱ्यांचे व ग्राहकांचे आर्थिक नुकसान, लहान मुलांचे व वृद्धांचे हाल होतात.
वीज कायदा 2003 (Electricity Act, 2003): कलम 57 (1) व 57(2): सेवा कार्यक्षमतेची अट पाळली नाही तर ग्राहकास भरपाई देणे बंधनकारक आहे. कलम 59: विलंब किंवा दुर्लक्ष केल्यास आर्थिक भरपाई देण्याची तरतूद आहे.

त्याचप्रमाणे MERC – “Standards of Performance” नियमावलीः कमी व्होल्टेज । फेज गेलेली समस्या ४-१२ तासात सोडवणं आवश्यक आहे. वेळेत सेवा न दिल्यास ग्राहकास दररोज ₹50-₹100 भरपाईची तरतूद आहे.
त्यामुळे या सर्व भागांचा विचार करता, संबंधित विभागाने तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करावा. नागरिकांनी केलेल्या तक्रारींवर लेखी उत्तर द्यावे. MERC च्या नियमानुसार सर्व पात्र ग्राहकांना भरपाई देण्यात यावी. पुढील काळात ही समस्या होणार नाही याची लेखी हमी द्यावी. अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले असून जर वेळेत कार्यवाही झाली नाही, तर नागरिकांतर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे.

निवेदनावर संगमनेर संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष राम अरगडे यांच्यासह, आदित्य रुपवते, विशाल वैराळ, विकी पवार, ओम टोरपे, यश गायकवाड, नवनाथ सदगीर, साजीद बेग, ओम वाघमारे आदींच्या सह्या व नावे आहेत.
