संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या स्वच्छतेसाठी आलेला निधी गेला कुठे — 

सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे यांचा सवाल ; आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी दिनांक 31

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या मार्गावरील कचरा साफ करणे, खड्डे बुजविणे, साईडपटटयावरील कच साफ करणे अशा प्रकारच्या सर्व कामांसाठी सरकारकडून वारकर्‍यांच्या सेवेसाठी करोडो रूपये खर्च केला जातो मात्र रस्त्याच्या अनेक समस्या पाहता हा पैसा गेला कुठे असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला असून लवकरात लवकर रस्त्याच्या त्रुटी दूर न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे यांनी दिला आहे.

जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळा 15 ते 20 दिवसात पुणे-हडपसर -ऊरूळी – सहजपूर – यवत – चौफुला – पाटस रोडवरून जाणार आहे. सहजपुर M Pack कंपनीपुढे पूर्ण रोडवर भरपूर मोठे खड्डे पडले आहेत. बोरीभडक गावच्या म्हेत्रे वस्तीजवळील बोरीऐंदी फाट्यावर रस्त्याकडेला पुण्यावरून सोलापूर कडे जाणारे टेम्पो, पिकअप वाले यांच्याकडून रस्त्यावर कचरा टाकला जात आहे. हडपसर पासून-यवत पर्यंतच्या रस्त्यावर जागोजागी अनधिकृत कचरा टाकला जात आहे.

सध्या कोरोना-रोगराईचा कालावधी चालू असल्याने रोजच दवाखाने फुल आहेत. कचरा दुर्गंधी यामुळे लहान मुले आजारी पडत आहेत. कासुडी-पाटस टोलनाक्यापर्यंतच्या रस्त्यावर धोकादायक खड्डे वाढले आहेत. यवत, भांडगाव, पाटस परिसरातही रस्त्याला खड्डे पडले आहेत. यवत कांचन सी फुड हाॅटेलपुढे, कांचन व्हेज हाॅटेलजवळ, लकी हाॅटेल जवळ, भाडगाव, चौफुला, पाटस, सहजपूर परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साईडपटटयावर माती-कच आली आहे. पावसाळा चालू असल्याने गाड्या रस्त्यावर घसरण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे.

प्रशासनाला एकच विनंती आहेत की, 15 ते 20 दिवसांत या रस्त्यावरून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा जाणार आहे. हडपसर पासून रस्त्यावरील खड्डे, साईडपटटयावरील माती-कच, रस्त्याकडेचा कचरा-घाण, लोखंडी जाळ्या, चौकाचौकांतील सिग्नल,पांढरे पट्टे सर्व दुरुस्त्या करून पालखीतील लाखो वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी कारवाई न केल्यास मी बोरीभडक पालखी स्वागत कमानीजवळ आंदोलन करणार आहे असे म्हेत्रे यांनी प्रसिद्ध पत्रकार म्हटले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!