डॉ. बबन चव्हाण यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ग्रामीण विभागातून ‘उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार’ प्रदान

प्रतिनिधी —
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मानाचा उत्कृष्ट ग्रंथपाल परस्कार संगमनेर नगरपालिका कला, दा.ज.मालपाणी वाणिज्य आणि ब.ना.सारडा विज्ञान महाविद्यालयातील ग्रंथपाल डॉ.चव्हाण बबन विठठ्लराव यांना प्रदान करण्यात आला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७३ व्या वर्धापनदिनी विद्यापीठाचा (ग्रामीण विभाग ) उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार नुकताच विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.

या पुरस्काराच्या सोहळयाप्रसंगी कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर, प्र.कुलगुरु डॉ. एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, सत्कारमुर्ती ग्रंथपाल डॉ.बबन चव्हाण, त्यांच्या पत्नी ज्योती चव्हाण, संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड आदी उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा कडून देण्यात येणारा उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार हा पहिला मान संगमनेर महाविद्यालयाने प्राप्त केला आहे.
महाविद्यालयास ‘उत्कृष्ट ग्रंथपाल ‘ हा पुरस्कार मिळाल्याबदद्ल शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांनी प्रा.डॉ.बबन चव्हाण यांचे अभिनंदन केले.

हा पुरस्कार शिक्षण प्रसारक संस्थेच्या व महाविद्यालयाच्या दृष्टीने गौरवाची बाब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, विद्यार्थी केंद्रस्थानी मानून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व गुणात्मक विकासासाठी सुसज्ज ग्रंथालय असावे, ग्रंथालयाचे पूर्ण संगणकीकरण, सर्व सोयीसुविधायुक्त ग्रंथालय असा दूरगामी दृष्टीकोन ठेवून व्यवस्थापन मंडळाने सातत्याने प्रयत्न केले असल्याचे सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.बबन चव्हाण हे महाविद्यालयात १९९९ पासून महाविद्यालयात कार्यरत आहेत. महाविद्यालयास कोणताही पुरस्कार मिळण्यामागे संस्था व महाविद्यालय यामधील प्रत्येक घटक महत्वाचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या सर्व गोष्टींचा समन्वय, संस्थेमध्ये होणारी विकासात्मक, गुणात्मक, आणि सामाजिक कामे इ.चा मुलतः विचार करुन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी डॉ.चव्हाण बबन यांना उत्कृष्ट ग्रंथपाल म्हणून गौरविण्यात आले असल्याचे सांगितले.

उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार ‘ मिळाल्याबद्दल शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश क्षत्रिय,सेक्रेटरी डॉ.अनिल राठी, खजिनदार राजकुमार गांधी, जनरल सेक्रेटरी सीए नारायण कलंत्री, व्यवस्थापनातील सर्व सदस्य,शिक्षक व शिक्षकेतर सहकारी यांनी ग्रंथपालांचे अभिनंदन केले व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या.

