भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयाची एसएससी परीक्षेत “यशाची उत्तुंग भरारी….”
संगमनेर प्रतिनधी दिनांक 14
सह्याद्री शिक्षण संस्था बहुजन समाजाच्या तळागाळातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सातत्याने प्रयत्न करत असते. त्याचाच एक प्रत्यय म्हणून आज भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयातील एस एस सी (इ. 10 वी) या परीक्षेत गुणवंत विद्यार्थी आणि पालक यांचा सत्कार के बी दादा सभागृहात आयोजित करण्यात आला.

गतवर्षाचा स्वतःचाच रेकॉर्ड मोडत भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयाने इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये अतिशय घवघवीत यश संपादन केले. यावर्षी विद्यालयाचा शे.निकाल 98.85 % इतका लागला आहे. मार्च 2025 इ. 10 वी शालांत परीक्षेत कु. वऱ्हाडे दिशा संतोष या विद्यार्थिनीने 96.60 % गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक व तालुक्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.

विद्यालयाची निकालाची परंपरा कायम राखत यावर्षी 90% पेक्षा जास्त येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढली आहे. एकूण 39 विद्यार्थी 90% च्या पुढे गुण मिळवून गुणवंत ठरलेले आहेत. यावर्षी विद्यालयातून 438 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झालेले होते. त्यापैकी विशेष प्राविण्यासह 174, प्रथम श्रेणी मध्ये 138, तर द्वितीय श्रेणीत 88, आणि पास श्रेणीमध्ये 33 विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत.

वऱ्हाडे दिशा संतोष हिने 96.60 % गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. हिवरेकर सई महेश,काकड श्रेया भाऊसाहेब,सहाणे प्रज्वल वसंत हे तीन विद्यार्थी 95.80% गुण मिळवून द्वितीय आले. ढवळे संपदा महेश,पावसे प्राची जयराम हे दोन विद्यार्थी 95.60% गुण मिळवून तृतीय आले. गुंजाळ प्रणव कैलास, कर्पे ध्रुव दादासाहेब,सूर्यवंशी ईश्वरी राहुल हे तीन विद्यार्थी 95.20% गुण मिळवून चतुर्थ आले. तसेच अन्सारी मेहरीनजीया मन्नान,दिघे तेजस दत्तू, गुंजाळ ईश्वरी बाळू हे तीन विद्यार्थी 95.00% गुण मिळवून पंचम आले.

याप्रसंगी सर्व 39 गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांचा तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक के जी खेमनर आणि सर्वच मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या हस्ते करण्यात आला.
या सत्कार सोहळ्याच्या प्रसंगी संस्थेचे सह- सचिव बाबुराव गवांदे यांनी मनोगत व्यक्त करून सर्व विद्यार्थ्यांचे व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. प्रास्ताविका मध्ये मुख्याध्यापक के जी खेमनर यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. व्यासपीठावर पर्यवेक्षिका रणशुर मॅडम शिक्षक प्रतिनिधी दिघे सर शिक्षिका प्रतिनिधी सोनवणे शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.व्ही. गुंजाळ यांनी केले तर आभार अण्णासाहेब दिघे यांनी मानले.
एसएमबीटी कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे आ.सत्यजितदादा तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.जयश्री थोरात, संस्थेचे सेक्रेटरी सुमंत कोल्हे , खजिनदार ॲड.ज्ञानेश्वर सांगळे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
