मोदी सरकारचा जातीनिहाय जनगणना निर्णय – संगमनेर भाजपच्या वतीने सरकारचे अभिनंदन
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने जातिनिहाय जनगणना करण्याचा नुकताच निर्णय घेतला. या ऐतिहासिक निर्णयाचे संगमनेर भाजपच्या वतीने स्वागत करण्यात आले असून केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. भाजप शहराध्यक्ष पायल आशीष ताजणे यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिलीच बैठक पक्ष कार्यालयात पार पडली,

पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी अंत्योदय कल्याणाचा नारा देऊन समाजातील प्रत्येक जाती धर्मातील शेवटच्या सामान्य माणसापर्यंत लाभ कसा पोहचेल यासाठी प्रयत्न करण्याचा एकात्म मानववादाचा संदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता. त्याप्रमाणे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा करून अंत्योदय उद्धाराचा पाया रचला आहे असे मत राजेंद्र देशमुख यांनी मांडले.

देशहितासाठी सर्वोच्च असलेले अनेक ऐतिहासिक निर्णय घेणारे मोदी सरकार आज पुन्हा एकदा आपल्या जातीनिहाय जनगणनेच्या लोककल्याणकारी निर्णयाने देशवासीयांच्या कौतुकास पात्र ठरले असल्याची भावना शहराध्यक्ष सौ पायल आशिष ताजणे यांनी व्यक्त केली.तसेच येणाऱ्या काळात जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनात संगमनेर शहर व घुलेवाडी गटातील अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.

यावेळी भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते दिनेश सोमाणी यांची शहरातील अग्रगण्य महेश नागरी पतसंस्थेच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. संगमनेर शहर व तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी “जातनिहाय जनगणना करणाऱ्या मोदी सरकारचा विजय असो” अशा घोषणा देत जल्लोष साजरा केला. “मोदी सरकार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है”, ‘धन्यवाद धन्यवाद मोदीजी धन्यवाद, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते रामभाऊ जाजु, डॉ. अशोक इथापे, राजेंद्र सांगळे, राजेंद्र देशमुख, वैभव लाडंगे, काशिनाथ पावसे, दिनेश सोमाणी, हरिश्चंद्र चकोर, अशोक कानवडे, प्रशांत वाडेकर, दिपक भगत, शरद गोर्डे, आशिष ताजणे, जग्गु शिंदे, सुरेखा खरे, अरुणा पवार, ज्योती भोर, अंजना भालसिंग, कांचणताई ढोरे, पांडुरंग शेराल, हर्षवर्धन खुळे, नितीन शिंदे, भगवान कुक्कर, दिलिप रावळ, दिपेश ताटकर, शाम कोळपकर, भारत गवळी, विशाल एनगुंदल, रविंद्र उडता, विकास गुळवे, कल्पेश पोगुल, संतोष पठाडे, योगेश लष्करे, श्रीनिवास वलूसा , श्रद्धा घोडे, मुकुंद उपरे, पप्पू तेजी, सुदर्शन इटप, सागर भोईर, मनोज जुंदरे, शिवकुमार भंगीरे, यांसह शहर व तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
