अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान ; आमदार खताळ यांनी केली पाहणी

तातडीने पंचनामे करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना 

संगमनेर प्रतिनिधी दि. 3

येथून मागच्या काळात तोंड पाहून पंचनामे केले जात होते. त्यामुळे खऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नव्हती. मात्र आता अधिकार्यांनी ज्या शेतकऱ्यांचे खरेच नुकसान झाले आहे. अशा सर्व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करावेत अशा सूचना आमदार अमोल खताळ यांनी तहसीलदार, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना दिल्या आहेत.

संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ, धांदरफळ, मिर्झापूर, नांदुरी दुमाला, कौठे धांदरफळ, नांदूर खंदरमाळ आणि जांबुत या गावात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आमदार खताळ यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. सर्वप्रथम कोठे धांदरफळ येथील निवृत्ती म्हतारबा घुले यांच्या मालकीच्या दोन गाईंवर विज पडून दगावल्या होत्या. त्यांच्या गोठ्याला भेट देत पाहणी केली आणि तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश पशुवैद्यकीय अधिकार्यांना दिले. शासनाच्या वतीने मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.

नांदुरी दुमाला येथील जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षक भिंतीवर झाड पडून भिंत पडली. तसेच गावातील नामदेव दगडू कोठवळ यांचा कांदा, राहुल दत्तू कवडे यांच्या काढणीस आलेल्याद्राक्ष बागेची, सुरेश काशिनाथ शेटे यांच्या कांदा, शिवाजी मारुती शेटे आणि गजानन नेहे, यांची डाळिंब बागेची पाहणी आमदार खताळ यांनी केली.

मिर्झापूरचे गणेश वलवे यांचा टोमॅटो, शिवाजी रभाजी दिवटे यांची शेड नेट मधील सिमला मिरची, अशोक नाना वलवे यांचे ऊस, धांदरफळ येथील बाबा साहेब भाऊ खताळ यांचा गहू, सावरगाव तळ येथील सोमनाथ शंकर थिटमे तसेच साहेबराव बाळाजी कचरे यांनी साठवून ठेवलेल्या कांदा, तसेच दत्तू गंगाधर शेळके व संतोष एकनाथ नेहे यांच्या शेतातील कांदा आणि उन्हाळी बाजरी यााा पिकांच्या नुकसानीची माहिती आमदार खताळ यांनी घेतली. नांदूर खंदरमाळ आणि जांबुत येथील नुकसान ग्रस्त भागाचे सुद्धा तात्काळ पंचनामे करण्यात यावे असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!