पराभवानंतर काहींना छत्रपती शिवाजीं महाराजांची जयंती सुचली — आमदार अमोल खताळ
संगमनेर प्रतिनिधी दि. 17
संगमनेरात गेली चाळीस वर्षात शिव जयंती साजरी न करणारे आज शिवजयंती साजरी करीत आहेत. परिवर्तन झाल्यानंतरच काही जणांना शिवजयंती साजरी करण्याचे सुचले आहे. अशी टीका आमदार अमोल खताळ यांनी केली आहे.

संगमनेर शहरातील बसस्थानक आवारात महायुतीच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा आणि किल्ला देखाव्याचे उद्घाटन आमदार अमोल खताळ व त्यांच्या पत्नी निलम खताळ यांच्या हस्तेकरण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

आमदार खताळ म्हणाले की, संगमनेरला महायुतीच्या वतीने शिवजन्मोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात येत आहे. मागील महिन्यात सुद्धा शिवजयंतीमोठ्या उत्साहात शिवसेना महायुतीच्या वतीने साजरी करण्यात आली होती. त्याचवेळी स्पष्ट करण्यात आले होते की पुढील महिन्यात मोठ्या उत्साहात आपण मिरवणूक, किल्ला देखावा सादर करून जयंती साजरी करणार आहोत. पुढील कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व महापुरुष यांचे कार्यक्रम महायुतीच्या वतीने घेतले जाणार आहेत.

महायुती आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने आयोजित सर्व कार्यक्रमामध्ये तसेच मिरवणुकीत शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आमदार खताळ यांनी केले. यावेळी संगमनेरकर शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
