शिवजयंतीत राजकारण करणे हे अत्यंत दुर्दैवी — आमदार सत्यजित तांबे

संगमनेर प्रतिनिधी दि. 17

रयतेचे राजे असलेल्या छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करताना संगमनेर बसस्थानकात शिवरायांचे मंदिर उभारणी करत असताना शिवजयंती सोहळा समितीला राजकीय हेतूने प्रेरित होऊन जो त्रास देण्यात आला तो अत्यंत दुर्दैवी असून शिवजयंती सारख्या सर्व समावेशक कार्यक्रमात राजकारण करणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे प्रतिपादन आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या भव्य देखाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, अमर कतारी, विश्वास मुर्तडक, निखिल पापडेजा, ॲड. सुहास आहेर, सोमेश्वर दिवटे, किशोर टोकसे महिला पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, शिवजयंतीच्या निमित्ताने मंदिर उभारण्यासाठी अनेक अडचणी निर्माण केल्या गेल्या. जागा मिळवण्यासाठी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करावा लागला. ही जागा आपल्याला देऊ नये यासाठी प्रशासनावर मोठा दबाव टाकला गेला. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे दैवत आहे. त्यांनी जगाला दिशा दाखवली. त्यांच्या जयंती मधले कसले राजकारण करता असा सवाल विचारताना महाराजांच्या जयंती मध्ये कधीही राजकारण नको जात-पात धर्म नको. संगमनेर बसस्थानकासमोर अश्वारूढ पुतळा व्हावा याकरता 2017 मध्ये सौ. दुर्गाताई तांबे नगराध्यक्ष असताना नगरपरिषदेने ठराव केला. 2024 मध्ये आपण ही जागा मंजूर करून घेतली निधीची मागणी केली.

बस स्थानकासमोर दर्शनी भागात लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभा करणार आहोत. याचबरोबर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा, संविधान स्मारक शहीद स्मारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. महापुरुषांच्या स्मारकामध्ये श्रेयवाद नको. प्रत्येकाने त्यामध्ये योगदान द्यावे. प्रशासनावर प्रचंड दबाव असतानाही त्यांनी मंदिर उभारण्यासाठी परवानगी दिली याबद्दल आणि अत्यंत सुंदर देखावा केल्याबद्दल स्वाभिमानी शहर व तालुका शिवजयंती समितीच्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी कौतुक केले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!