प्रसिद्ध उद्योजक राजेश मालपाणी यांच्या नावाचा वापर करत मालपाणी उद्योग समूहातच ५० लाख रुपयांची मागणी प्रकरण….
अद्यापही आरोपी सापडले नाहीत ; गुन्ह्याचा तपास सुरू आहे
गुन्ह्यांचा तपास आणि संशय कल्लोळ…
संगमनेर प्रतिनिधी दि. 9
महाराष्ट्रासह देशात प्रसिद्ध असलेल्या संगमनेर येथील मालपाणी उद्योग समूहाचे प्रमुख राजेश मालपाणी यांचे नाव वापरून मालपाणी उद्योग समूहातच 50 लाख रुपये मागणी करण्याचे प्रकरण सुमारे आठ महिन्यांपूर्वी घडले होते. यासंदर्भात गुन्हा देखील दाखल झाला. मात्र अद्यापही संगमनेर पोलिसांना आरोपी सापडले नसल्याने या तपासाबाबतही संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.

2024 या सालात ही घटना घडली असून मालपाणी उद्योग समूहाच्या मुख्य कार्यालयात सकाळी सकाळी फोनवरून राजेश मालपाणी हे स्वतः बोलत असल्याचे भासवून 49 लाख 60 हजार 503 रुपयांची मागणी करत पैसे उकळण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र मालपाणी हाऊस मधल्या अधिकाऱ्यांना वेळीच संशय आल्याने हा प्रत्यक्ष गुन्हा घडण्याचा प्रकार टळला. या संदर्भात पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन गुन्हा नोंदविण्यात आला होता. आता या प्रकरणाला साधारण आठ महिने होत आले असले तरी तपासात मात्र कुठलीही प्रगती नसून आरोपी पोलिसांना सापडलेले नाहीत.

राजेश मालपाणी हे स्वतः फोनवरून बोलत आहेत असे भासवून माझ्या खात्यावर ताबडतोब 49 लाख 60 हजार 503 रुपये तात्काळ पाठवा असा फोन इंग्रजीतून कंपनीत करण्यात आला. मी मीटिंगमध्ये बिझी आहे, मला आता फोन करू नका, मीटिंग संपल्यावर मीच फोन करतो असेही त्यावेळी सांगितले. त्यानंतर प्रत्यक्ष उद्योग समूहाच्या प्रमुखाचा फोन असल्याकारणाने संबंधित अधिकाऱ्यांनी धावपळ करून पैशा संदर्भात जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे अधिकाऱ्यांना संशय आल्याने मालपाणी यांच्या बंधूंनी थेट राजेश मालपणी यांच्याशी संपर्क करून खातरजमा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अशी कुठलीही मागणी केली नसल्याचे समोर आले.

त्यानंतर राजेश प्रसाद दौलत प्रसाद दुबे यांनी यासंदर्भात फिर्याद दिल्यानंतर अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अज्ञात इस मागणी फोनवरून थेट मालपाणी बोलतो आहे असे वाचून हा गुन्हा केला असल्याने त्यांना उद्योग समूहातील बरीचशी माहिती असावी अशी चर्चा त्यावेळी होती. आठ महिने होत आले असले तरी गुन्ह्याच्या तपासात प्रगती नसून आरोपी देखील सापडलेले नाहीत. विशेषतः तांत्रिक बाबीतला तपास असून पोलीस नेमके कुठे कमी पडत आहेत हे समजण्यास मार्ग नाही. संबंधित आरोपी हे मात्र परराज्यातील आहेत अशी माहिती समजली आहे.
