महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री ; बाळासाहेब थोरात!

महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून ज्यांच्याकडे आज संपूर्ण महाराष्ट्र आदराने बघतोय असे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात स वाढदिवसाच्या निमित्ताने यांचे निकटचे विश्वासू सहकारी नामदेव गुंजाळ यांनी लिहिलेला लेख
सन १९८५ साली साहेब अपक्ष आमदार म्हणून निवडून आले, तेव्हा पासुन मी साहेबां समवेत काम करतोय. त्यावेळी खर तर हि निवडणूक पाणी प्रश्न केंद्रस्थानी ठेऊन झाली. भंडारदरा धरणातील प्रवरेच्या पाण्यावर संगमनेर – अकोल्याचा कोणताही कायदेशीर हक्क नव्हता. त्यामुळे पूर्व भागातील राजकीय नेत्यांनी संगमनेर अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाणी उपसण्याला कायदेशीर व राजकीय हरकत घेत अडथळे आणले होते.
आमदार थोरात यांनी प्रवरेच्या पाण्याच्या फेरवाटपाचा आग्रह धरून त्यासाठी लोक चळवळ करीत १९८९ साली पाण्याचे फेरवाटप करून भंडारदरा धरणातील ३० टक्के पाणी संगमनेर अकोल्याला मिळवून दिले.
हे त्यांच्या हातून झालेले सगळ्यात मोठे ऐतिहासिक कार्य आहे. त्याच काळात मी महाराष्ट्र होमिओपँथिक वैद्यकीय महाविद्यालयास साहेबांच्या मार्गदर्शनाखाली

संगमनेर तालुक्यात परवानगी मिळवली व बघता बघता मेडिकल कॉलेज मध्ये या तालुक्याने देशात पहिला क्रमांक मिळविला. म्हणजेच देशात तालुका स्थरावर इतकी कॉलेज फक्त संगमनेरलाच आहेत हे सर्व साहेबांमुळेच.
साहेबानी संकरित दुधाळ गाई व गावोगाव सहकारी दुधडेअरी काढून दूध धंद्याला चालना दिली. त्यातून शेतीला जोडधंदा आणि गावोगाव खूप मोठा रोजगार निर्माण झाला. आज आपल्या तालुक्यात दररोज सुमारे सात लाख लिटर्स दुध उत्पादन होते. हा एक खूप मोठा विक्रम आहे. तालुक्याच्या विकासात या दूध धंद्याचे मोठे योगदान आहे.
शिक्षण क्षेत्रात गावोगावी माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, मेडिकल ईजिंनिअरीगं इ. कॉलेज काढण्यास आमदार बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेतला. शिक्षण क्षेत्रात तालुक्यात ११० मराठी माध्यमिक शाळा, ९ मेडिकल कॉलेजेस, अनेक सिनियर व तंत्र कॉलेजेस निघाली. त्यामुळे संगमनेर हे राज्यात एक एज्युकेशन हब बनले आहे.
यातून देखील मोठी रोजगार निर्मिती झाली आहे.
संगमनेर शहरात राज्यातील सर्व बँकेच्या शाखा या ठीकाणी आल्या व तालुक्यात पतसंस्थांचे जाळे विणून त्या मार्फत लोकांना उद्योग व्यवसायासाठी वित्त पुरवठा झाला. यातून मोठी प्रगती झाली. व्यापार उदीम वाढला. आज तालुक्यातील सरकारी बँका, सहकारी बँका, खाजगी बँका, पत संस्था यातील ठेवींची एकूण रक्कम राज्यात आघाडी घेणारी आहे.

पाटबंधारे मंत्री पदाच्या माध्यमातून निळवंडे धरण पूर्ण करण्याला प्राधान्य दीले व आज शहराला स्वच्छ पाणी मिळतय. पंधरा वर्षाच्या मंत्री पदाच्या काळात निळवंडे धरण पुनर्वसनसह पूर्ण केले. कालव्यांची ८० टक्के कामे पूर्ण केली.
कृषी मंत्री पदाच्या काळात तालुक्यात विक्रमी शेततळे निर्माण करण्यात आली. निळवंडे ते संगमनेर थेट पिण्याच्या पाण्याची लाईन संगमनेर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला.
तालुक्यात सर्व आघाड्यावर विकास, फुललेली बाजारपेठ, शांतता व सुव्यवस्था, जातीय व धार्मिक सलोखा यामुळे एक प्रगत तालुका म्हणून संगमनेरची ओळख करून दिली.

पस्तीस वर्षाची आमदारकी, २० वर्षाचे मंत्रिपद, अब्जावधी ची उलाढाल असलेल्या अनेक सहकारी संस्थांचे नेतृत्व असतांना कोणताही शिंतोडा नाही. अभ्यासू लोकप्रतिनिधी, निष्ठावान काँग्रेसमन, मोठा जनाधार, स्वच्छ प्रतिमा, कुशल प्रशासन, प्रश्न सोडवण्याचे कौशल्य, नेतृत्वाचा विश्वास यामुळे भविष्यात उद्याच्या महाराष्ट्राचे नेतृत्व त्यांच्याकडे चालत येईल याची खात्री वाटते.
बाळासाहेब थोरात साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
नामदेव गुंजाळ, संगमनेर

