कर्जत जामखेड मतदार संघ राज्यात “मॉडेल” मतदारसंघ म्हणून ओळखला जाणार
आमदार रोहित पवार

प्रतिनिधी —
गेली दोन वर्षे कोरोनाचा कठीण काळ असतानाही अविरत प्रयत्न करीत मतदारसंघातील रस्ते, सरकारी कार्यालयांच्या इमारती, रुग्णालयाच्या इमारती, पाणीपुरवठा अशा विविध विकास कामांसाठी भरीव निधी मंजूर करुन आणला. त्याचे दृष्य परिणाम आता हळूहळू दिसत आहेत. असे सांगत, मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करुन हा मतदारसंघ राज्यात ‘मॉडेल’ मतदारसंघ म्हणून बांधण्याचा माझा प्रयत्न आहे.
असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले आहे.
कर्जत तालुक्यातील काही कामांचे भूमिपूजन तर काही कामांचे लोकार्पण आमदार पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

सर्वसामान्यांची मुलं ज्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असतात त्या शाळा अद्ययावत करुन तिथे सर्वोत्तम दर्जाचं शिक्षण कसं मिळेल, यासाठी माझा नेहमीच प्रयत्न राहिलाय. असे त्यांनी स्पष्ट केले. त्यादृष्टीने बेलगावमधील जिल्हा परिषदेच्या शाळेला आमदार निधीतून डिजिटल बोर्ड, संगणक, टॅब, बेंजेस, पुस्तकं तसंच प्रयोगशाळा साहित्य देण्यात आले आहे. नागलवाडीमध्ये सिमेंट रस्त्याचे तर बेलगावमध्ये बांधण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाचे या वेळी लोकार्पण करण्यात आले.
निमगाव गांगर्डामध्ये बांधण्यात येणाऱ्या अद्ययावत तलाठी कार्यालयाच्या कामाचे भूमिपूजन आणि गावातील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे लोकार्पण आमदार पवार यांनी केले. मांदळी इथे सामाजिक सभागृहाच्या कामाचे आणि सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केले. आणि ग्रामस्थांशी संवाद साधला.
थेरगावमध्ये सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वमीवर स्वच्छतेला कमालीचं महत्त्वं आलंय. असे सांगतनाच मतदारसंघात कोंभळी इथल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ‘कर्जत जामखेड एकात्मिक विकास फाऊंडेशन’च्या माध्यमातून स्वच्छतागृह, हात धुण्याची सुविधा आणि पाणीपुरवठ्याची सुविधा उभारण्यात येते असलेल्या कामाचं भूमिपूजन आमदार पवार यांनी केले.
तसेच या शाळेला खेळाचे साहित्य देण्यात आले. कोंभळीमध्ये बांधण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे लोकार्पण तसेच चांदे बुद्रुक येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मुलींच्या स्वच्छतागृहाच्या कामाचे भूमिपूजन, शाळेला लागणारे शालेय साहित्य, मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
शिवाय गावातील व्यायामशाळा व सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे लोकार्पण आणि तलाठी कार्यालयाचं भूमिपूजन, वालवडमध्ये सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे लोकार्पण आणि तलाठी कार्यालयाच्या बांधकामाचं भूमिपूजन, भोसे इथं तलाठी कार्यालयाच्या नूतन वास्तूचं भूमिपूजन आणि सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याचं लोकार्पण, बिटकेवाडीमध्ये तलाठी कार्यालयाच्या इमारतीचं भूमिपूजन, ‘कर्जत जामखेड एकात्मिक विकास फाऊंडेशन’च्या माध्यमातून शिंदे गावातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह आणि हात धुण्याच्या सुविधेचं भूमिपूजन, थेरगांवमध्ये ओपन जिमचं लोकार्पण अशी विविध विकासात्मक कामे करण्यात आली.

यावेळी जिल्हा क्रिडा अधिकारी भाग्यश्री बिले, तालुका क्रिडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
