भाजपने जाणीवपूर्वक नगरपालिकेच्या निवडणुका टाळल्या !
माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांचा आरोप
नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी थेट रस्त्यावर
संगमनेर दि. 1
भारतीय जनता पार्टीने जाणीवपूर्वक गेले तीन वर्षे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या घेण्याचे टाळले आहे. त्यामुळे नगरसेवक पद अस्तित्वात नसल्याने सर्वसामान्य जनतेची कामे रखडलेली आहेत असा आरोप करीत सामान्य नागरिकांना वारंवार पालिकेत चकरा मारूनही त्यांचे काम होत नाही. त्यामुळे सत्तेत असो अथवा नसो सामान्य जनतेच्या कामासाठी कायम सदैव पुढे राहणार आहोत अशी पोस्ट सोशल मीडियात प्रसिद्ध केली तांबे यांनी आहे. या व्हायरल पोस्टमुळे शहरात सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.

माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टीने जाणीवपूर्वक गेली ३ वर्षे नगरपालिकेच्या निवडणुका टाळल्याने जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नगरसेवक अस्तित्वात नाहीत, याची जाणीव ठेवत माजी नगरसेवक आणि मी सोबत सतत जनतेचे प्रश्न सोडवत असतो. नागरिकांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून जनतेचे प्रत्येक प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर असतात. पद असो किंवा नसो, आमची बांधिलकी ही जनतेसोबत आहे. याच संवादाचा भाग म्हणून माताडे मळा येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

लोकप्रतिनिधी नसतानाही आपल्या हितासाठी आपल्या हक्काची माणसं कार्यरत आहेत या भावनेने स्थानिक नागरिकांनीही आनंद व्यक्त केला.
तांबे यांच्या या पोस्टमुळे संगमनेर शहरात चर्चेला उधाण आले असून नगरपालिकेच्या निवडणुकांचे हे पडघम सुरू झाले असल्याचे बोलले जात आहे.

